नेपाळमधील पुराच्या खडतर प्रवासानंतर मानसी पारेख अखेर घरी परतली...
नेपाळमधील पुरमध्ये मानसी पारेख अडकल्याची बातमी समोर आली होती. आता ती मुंबईला परतली आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : August 31, 2026 at 10:47 AM IST
हैदराबाद : हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि टीव्ही अभिनेत्री मानसी पारेख कैलास मानसरोवर यात्रेवरून मुंबईत परतली आहे. नेपाळमधील अचानक आलेल्या पुरानंतर खूप गोंधळ उडला होता, अनेक लोक बेपत्ता झाली याशिवाय यात, अनेकांनी आपला जीव गमावला. नेपाळ पूर हा खूप भीषण होता. आता देखील तिथे लोकांच्या मदतीसाठी अनेक उपयोगी वस्तू भारतातून पाठविल्या जात आहेत. दरम्यान नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळं मानसी बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये आणि कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
एक खूप दुःखद आणि भीतीदायक अनुभव : ईशा फाऊंडेशनचे 93 लोक कैलास मानसरोवर यात्रेला गेले असल्याचं समोर आलं होतं. यात हे लोक तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता होते, असंही म्हटलं गेलं होतं. आता यामध्ये मानसी पारेख मुंबईला परतली आहे. मानसी मुंबई विमानतळावर पोहोचताच तिला पाहून तिचे कुटुंबीय भावूक झाल्याचे दिसले. मानसी पारेखनं तिच्या आध्यात्मिक यात्रेदरम्यान आलेल्या दुर्घटनेबद्दल काही गोष्टी उघड केल्या आणि आपला अनुभव शेअर केला. आध्यात्मिक यात्रेदरम्यान आलेल्या दुर्घटनेबद्दल तिनं म्हटलं. "हा प्रवास खूप लांब आणि कठीण होता. तिबेट आणि नेपाळच्या सीमेवर एक मोठी इमिग्रेशन इमारत आहे. आम्ही सात दिवसांपूर्वीच त्या इमिग्रेशन इमारतीतून चीनमध्ये प्रवेश केला आणि आमची कैलास यात्रा संपल्यावर आम्ही चीनमधून परत येणार होतो. पण फक्त 24 तासांपूर्वी, जेव्हा आम्ही व्हिडिओ पाहिले आणि या दुर्घटनेबद्दल कळले, यानंतर आम्हाला शब्दच सुचत नव्हते. ती एवढी मोठी इमारत असून वाहून गेली, आणि संपूर्ण गाव वाहून गेलं. अवघ्या 24 तासांत, संपूर्ण गाव नाहीसे झाले. हा एक खूप भयानक अनुभव होता. या क्षणी आम्हाला जाणवले की, आयुष्यात काहीही घडू शकते. आयुष्य खूप अनिश्चित आहे.
यानंतर मानसीनं पुढं सांगितलं की, "संपूर्ण परिसर चिखलाखाली बुडाला आहे, आणि लोकांना शोध घेणं खूप कठीण आहे. हे खूप दुःखद आहे. पाण्याचा प्रवाह खूप जोरदार होता की, लोक 300 किलोमीटर दूर वाहून गेले. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे जी कोणीही थांबवू शकत नाही. हा एक असा अपघात होता, यावर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. कोणीही ते टाळू शकले नाही. असे काही घडणार याबद्दलकोणी कल्पनाही केली नव्हती. हा एक असा अनुभव होता ज्यावर माझा विश्वास बसत नाही. हे खूप दुःखद आहे."
मानसी पारेखच्या बेपत्ता झाल्याच्या बातमीमुळं खळबळ उडाली : कैलाश मानसरोवर यात्रेदरम्यान मानसी पारेख बेपत्ता झाल्याच्या बातमी आल्यानंतर चाहते आणि कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं. नेपाळमधील असे काही व्हिडिओ समोर आले होते, जे खूप भीतीदायक होते. दरम्यान सोशल मीडियावर अनेक लोक ती सुरक्षित असावी याबद्दल प्रार्थना करत होते. आता ती सुखरूप भारतात परतल्यानंतर हितचिंतकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान नेपाळ दुर्घटनेच्या काही तासपूर्वी मानसीनं सोशल मीडियावर तिच्या मानसरोवर यात्रेची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली होती. यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये आणि कुटुंबात चिंता वाढली होती.

