ETV Bharat / entertainment

संजय मिश्रा आणि महिमा चौधरी स्टारर 'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' चित्रपट होणार 'या' दिवशी रिलीज...

संजय मिश्रा आणि महिमा चौधरी अभिनीत 'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' हा लवकरच रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Durlabh Prasad Ki Dusri Shadi movie
'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' चित्रपट ('दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' चित्रपटाचे पोस्टर.)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : November 17, 2025 at 5:19 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : अभिनेता संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांचा वधू-वर म्हणून एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. अनेकांना वाटलं होत, की महिमा चौधरीनं खरचं लग्न केलं असणार, मात्र असं काही नव्हते. संजय मिश्रा आणि महिमा चौधरी याचा 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये दोन्ही स्टार्सभोवती कहाणी फिरणार आहे. दरम्यान 'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी'च्या रिलीज डेटचे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये महिमा चौधरी लाल ब्राइडल लेहेंग्यात चमकताना दिसत आहे. याशिवाय पोस्टरमध्ये संजय मिश्रा यांच्या हातात फुलांची माळ असून ते तिच्याकडे खोडकरपणे पाहत असल्याचे दिसत आहे. हा पोस्टर खूप मजेशीर आहे.

'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' चित्रपटाची कहाणी : दरम्यान समोर आलेल्या पोस्टरमध्ये व्योम यादव आणि पलक लालवानी देखील आहेत. तसेच पार्श्वभूमीत लग्नाच्या मिरवणुकीची गर्दीही दिसत आहे. १९ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये एक वेगळी कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दुर्लभ प्रसाद यांचे दुसरे लग्न आणि प्रेमाबद्दल चित्रपटामध्ये दाखविण्यात येणार आहे. दरम्यान चित्रपटाचे निर्माते, एकांश बच्चन आणि हर्षा बच्चन यांनी सांगितलं की, "हा चित्रपट आमच्यासाठी खास आहे, कारण तो पुन्हा सुरुवात करण्याच्या धाडसाचा उत्सव साजरा करतो. संजय जी आणि महिमा जीची जोडी पडद्यावर एक अनोखे, हृदयस्पर्शी सौंदर्य आणते."

'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' चित्रपटाची रिलीज डेट : सिद्धांत राज सिंग दिग्दर्शित, हा चित्रपट एकांश बच्चन आणि हर्षा बच्चन यांनी अक्ष एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार केला आहे. तसेच रमित ठाकूर या चित्रपटाची सह-निर्मिती करत आहेत. या चित्रपटाची कहाणी आणि पटकथा प्रशांत सिंग यांनी लिहिली आहे. संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये व्योम यादव, पलक लालवानी, प्रवीण सिंग सिसोदिया आणि श्रीकांत वर्मा यांच्याही विशेष भूमिका आहेत. 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' हा चित्रपट १९ डिसेंबर २०२५ रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना खूप हसायला मिळेल, असं चित्रपटाच्या पोस्टरवरून दिसत आहे.

हेही वाचा :

  1. महिमा चौधरी केलं संजय मिश्राबरोबर लग्न ? जाणून घ्या सत्य...
  2. विजय तेंडुलकर लिखित मराठीतलं 'माइलस्टोन' नाटक ‘घाशीराम कोतवाल’ आता हिंदी रंगभूमीवर!
  3. विजय राजला 'सन ऑफ सरदार 2'मधून दिला नारळ, 'या' अभिनेत्याची झाली चित्रपटात एंट्री - on of sardaar 2 movie