'धुरंधर 2'मध्ये 'बडे साहेब' म्हणून दिसणार इमरान हाश्मी? लेटरबॉक्समुळं झाली कास्टिंगची चर्चा...
'धुरंधर 2' चित्रपटामध्ये इमरान हाश्मी दिसणार असल्याच्या चर्चा या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 23, 2026 at 4:40 PM IST
हैदराबाद : 'धुरंधर 2' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट 2026 मधील सर्वात बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. पहिल्या भागाच्या जबरदस्त यशानंतर या फ्रँचायझीला विशेष स्थान मिळाले आहे. 'धुरंधर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. आता अनेकजण या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल वाट पाहात आहेत. 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या चित्रपटामध्ये रहमान डकैत (अक्षय खन्ना)च्या मृत्यूनंतर ल्यारीमध्ये हमजाचं (रणवीर सिंग) राज्य असल्याचं दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये हमजा आणि मेजर इक्बाल (अर्जुन रामपाल) यांच्यातील संघर्षावर लक्ष केंद्रित केलं जाईल, मात्र याचा खरा मास्टरमाइंड 'बडे साहेब' हा पडद्यामागे असणार आहे.
'धुरंधर: द रिव्हेंज'मध्ये इमरान हाश्मी दिसणार : 'धुरंधर: द रिव्हेंज'मध्ये जुनी आणि नवीन नावे आहेत. यात रणवीर सिंग, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, दानिश पांडोर आणि राकेश बेदी यांचा समावेश आहेत. तसेच एका रिपोर्टनुसार नवीन चेहऱ्यांमध्ये राज झुत्शी आणि यामी गौतम हे असणार असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटात यामी कॅमियो करताना दिसेल. तसेच या चित्रपटामध्ये अभिनेता इमरान हाश्मी हा देखील असणार असंही समोर आलंय. आता याबद्दल अधिकृत पुष्टी झालेली नाही. इमरान हाश्मीचे नाव समोर येताच, चाहत्यांमध्ये आता उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटामध्ये तो कदाचित 'बडे साहेब'ची भूमिका साकारताना दिसेल असा अंदाज लावला जात आहे. आता अनेकजण सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
बॉक्स ऑफिसवर संघर्ष : एका चाहत्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'खूप चांगली निवड.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'हे इमरान हाश्मीचे आहे तर आपण हा चित्रपट नक्की पाहाणार.' आणखी एकानं लिहिलं, 'हा चित्रपट खूप विशेष असणार.' दरम्यान पहिल्या 'धुरंधर' चित्रपटानं जगभरात अंदाजे 13 अब्ज कमाई केली. हा चित्रपट आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर सीक्वेलबद्दल देखील लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. आता अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत.
हेही वाचा :

