ETV Bharat / entertainment

'क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम' चित्रपटानं केली चार दिवसात बंप्पर कमाई...

'क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम' या चित्रपटानं चार दिवसात जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडत आहे.

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Movie
'क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम' (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 5, 2026 at 3:52 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज देणारा 'क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता चित्रपट आल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झालंय. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता सोशल मीडियावर आणि बुक माय शोवर चित्रपट ट्रेंडिंग ठरत आहे. या चित्रपटानं चार दिवसात 3.91 कोटींची कमाई केली. सध्या हा चित्रपट जोरदार कमाई करत असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवसापासून अनेक शहरांमध्ये हाऊसफुल जात असून मराठी शाळेच्या आठवणींमध्ये रमलेले प्रेक्षक भावुक होऊन चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांचे काही अनुभव शेअर करत आहेत.

प्रेक्षकांकडून चित्रपटाचं कौतुक : चित्रपटातील आशय, संवाद, भावनिक क्षण आणि वास्तववादी मांडणी यामुळे प्रेक्षक खूप प्रभावित झाले आहेत. आता या चित्रपटाला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच डोक्यावर घेतलं आहे. चित्रपटाच्या प्रभावी कथेची मांडणी, कलाकारांची नैसर्गिक अभिनयशैली, मनाला भिडणारे आहे. याशिवाय चित्रपटाचे संगीत आणि प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी मराठी मातीची ओढ यामुळे हा चित्रपट, केवळ एक सिनेमा न राहता एक अनुभव ठरत आहे. समीक्षकांकडूनही या चित्रपटाला भरभरून दाद मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलंय.

दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी केल्या भावना व्यक्त : सध्या प्रेक्षकांकडून दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यभरातून त्यांना कौतुकाचे मेसेजेस आणि शुभेच्छा मिळत आहेत. आता प्रेक्षक चित्रपट पाहिल्यानंतर थेट दिग्दर्शकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, "प्रेक्षकांचे प्रेम पाहून मी अक्षरशः भारावून गेलो आहे. आमच्या प्रत्येक चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे, मात्र यावेळी विषय वेगळा होता. एक संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर मांडला आणि त्यांनी तो मनापासून स्वीकारला, याचे खूप समाधान वाटते. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद मला पुढेही अधिक प्रामाणिक आणि त्यांच्या आवडीचे चित्रपट घेऊन येण्याची प्रेरणा देतो. मी सर्व रसिकप्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानतो." 'क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम' चित्रपट प्रदर्शित झाला असून यात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी क्षिती जोग, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि कादंबरी कदम अशी दमदार स्टारकास्ट आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

हेही वाचा :

  1. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटातून प्राजक्ता कोळीसह 'हे' स्टार्स देणार महत्वाचा संदेश...
  2. अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं महाराष्ट्र दिनानिमित्तानं 'या' आगामी चित्रपटाची केली घोषणा...