ETV Bharat / entertainment

'फोर मोअर शॉट्स प्लीज' फेम कीर्ती कुल्हारीच्या आयुष्यात आला नवीन जोडीदार, व्हिडिओ शेअर करून केलं नातं अधिकृत

अभिनेत्री कीर्ती कुल्हारीनं तिचं नातं अधिकृत केलं असून तिनं तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

kirti kulhari
कीर्ती कुल्हारी (IANS)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 2, 2026 at 2:40 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - 'फोर मोअर शॉट्स प्लीज' अभिनेत्री कीर्ती कुल्हारीनं नवीन वर्षाच्या निमित्तानं तिचे नातं अधिकृत केलं आहे. तिनं एक रील शेअर केली आहे, ज्यामध्ये ती चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊनच थांबली नाही तर तिने स्वतःचं नातंदेखील सार्वजनिक केलं. बऱ्याच अनुमानांनंतर, कीर्तीनं अखेर राजीव सिद्धार्थसोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी केली आहे. तिच्या घटस्फोटाला चार वर्ष झाली आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 नोव्हेंबरमध्ये राजीव-कीर्ती यांच्या डेटिंगचं गॉसिप सुरू झालं होतं. आता, कीर्तीनं एका गोड व्हिडिओसह इंस्टाग्रामवर तिचं नाते अधिकृत केलंय. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास, या लव्हबर्ड्सनी इंस्टाग्रामवर फोटो आणि एक रील पोस्ट केली, ज्यामध्ये कारमधील गोड सेल्फीपासून ते त्यांनी एकत्र घालवलेल्या सर्व खास क्षणांची झलक पाहायला मिळाली.

राजीव सिद्धार्थ कोण आहे? : रील शेअर करताना, या जोडप्यानं कॅप्शन दिलं, 'एक फोटो हजार शब्दांच्या बरोबरीचा असतो. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, 2026च्या शुभेच्छा.' दरम्यान शोभिता धुलिपालानं या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि गोंडस व्हिडिओवर लाल हार्टचा इमोजी पोस्ट केलं. राजीव सिद्धार्थबद्दल सांगायचं झालं तर तो झारखंडमधील धनबाद येथील रहिवासी असून त्याचा जन्म 11 एप्रिल 1986 रोजी झाला. तो 39 वर्षांचा आहे. हा अभिनेता इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे . त्याचे इंस्टाग्रामवर 1,07,000 फॉलोअर्स आहेत. राजीव सिद्धार्थ 'फोर मोअर शॉट्स प्लीज' आणि 'आश्रम' सारख्या लोकप्रिय सीरीजद्वारे प्रसिद्धीझोतात आला आहे. याशिवाय तो झी5 'लव्ह, सितारा' चित्रपटात शोभिता धुलिपालाबरोबर दिसला आहे.

कीर्ती कुल्हारीनं चार वर्षांपूर्वी घेतला होता घटस्फोट : कीर्ती कुल्हारीचं लग्न अभिनेता साहिल सहगलशी झालं होतं. दोघांची भेट एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली आणि काही काळ डेटिंग केल्यानंतर त्यांनी 2016 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या पाच वर्षांनंतर, कीर्तीनं 1 एप्रिल 2021 रोजी साहिलपासून वेगळे होण्याची घोषणा केली. अभिनेत्रीनं तिच्या इंस्टाग्रामवर पती साहिलपासून घटस्फोटाची घोषणा करत म्हटलं होतं की त्यांचा घटस्फोट 'कागदावर नाही तर खऱ्या आयुष्यात' होत आहे.

हेही वाचा :

  1. अभिनेत्री किर्ती कुल्हारी हिने घेतला नवऱ्यासोबत घटस्फोट
  2. सेटवर 'अदृष्य' वावरतात पंकत्र त्रिपाठी - किर्ती कुल्हारी
  3. इंडिया फिल्म प्रोजेक्ट २०१९: बॉलिवूड कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज