ETV Bharat / entertainment

'कौन बनेगा करोडपती 17'चा शेवट, सेटवर 32 मिनिटे सतत गाणं गाईल अमिताभ बच्चन...

'कौन बनेगा करोडपती 17'चा प्रवास संपत आहे. आता या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये अमिताभ बच्चन सेटवर 32 मिनिटे सतत गाणं गाणार आहे.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन (ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 3, 2026 at 3:43 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - 'कौन बनेगा करोडपती सीझन 17' आता त्याच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आज, शोचा बहुप्रतीक्षित ग्रँड फिनाले एपिसोड प्रसारित होईल. आता अमिताभ बच्चन एका भावनिक आणि संस्मरणीय एपिसोडसह 17व्या सीझनला निरोप देणार आहे. सीझनच्या अंतिम एपिसोडपूर्वी, निर्मात्यांनी दोन प्रोमो रिलीज केले आहेत, यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना आगामी एपिसोडची झलक शेअर केली आहे. 'कौन बनेगा करोडपती सीझन 17'च्या प्रोमोमध्ये, अमिताभ बच्चन कधीकधी भावनिक होताना आणि गाणं गाताना दिसत आहेत. याशिवाय प्रोमोमध्ये विनोदी अभिनेता किकू शारदा देखील त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन झाले भावनिक : प्रोमोमध्ये, अमिताभ बच्चन 'बागबान', 'होरी खेले रघुवीना', 'लावारीस' मधील 'मेरे अंगने में', 'सिलसिला'मधील 'रंग बरसे भीगे चुनर वाली' आणि 'तीसरी कामस'मधील 'चलत मुसाफिर'सारखी हिट गाणी गात आहेत. शेवटच्या भागामध्ये बिग बी 32 मिनिटे ही गाणी सादर करेल. दरम्यान या शोचा प्रोमो शेअर करताना निर्मात्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जेव्हा शेवट एक संस्मरणीय क्षण बनतो. आज रात्री 9 वाजता सोनी लिव्हवर कौन बनेगा करोडपतीच्या शेवटच्या भागात बिग बींचा एक खास सरप्राईज अ‍ॅक्ट पाहा.' 'केबीसी 17'च्या शेवटच्या भागात, अमिताभ बच्चन भावनिक भाषण देणार आहे. तसेच या शोमध्ये विनोदी कलाकार किकू शारदा हास्याची भर घालण्यासाठी येईल. ग्रँड फिनाले एपिसोडच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये, किकू शारदा त्याचे मजेदार विनोद प्रेक्षकांसमोर सादर करताना दिसत आहे.

केबीसी सीझन 17 व्हिडिओ स्टोरी : केबीसीच्या शेवटच्या भागात संपूर्ण सीझनमधील एक व्हिडिओ स्टोरी दाखविण्यात येईल , यानंतर सीझनमधील संस्मरणीय आणि भावनिक क्षण दाखवले जाईल. या कथेने बिग बी प्रभावित होतील आणि नंतर त्यांच्या गाण्यांनी वातावरण बदलताना दिसेल. तसेच काही दिवसापूर्वी अमिताभ बच्चन त्यांच्या नातू अगस्त्य नंदाबरोबर शोमध्ये दिसले होते. यावेळी त्यांचा नातू हा त्याच्या 'इक्कीस' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला होता.

हेही वाचा :

  1. 'कौन बनेगा करोडपती 17'मध्ये 'इक्कीस'चं प्रमोशन, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासमोर आली कठीण परिस्थिती...
  2. पंजाबी गायक दिलजीत दोसांझ 'कौन बनेगा करोडपती'मध्ये गेल्यानंतर वादात फसला, जाणून घ्या कारण...
  3. घरची परिस्थिती बेताची, बारावीपर्यंतच घेतलं शिक्षण; पैठणच्या तरुण शेतकऱ्यानं 'कौन बनेगा करोडपती' मध्ये जिंकले पन्नास लाख