'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे आले एकत्र...
'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. आता या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे एकत्र दिसणार आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : December 12, 2025 at 5:25 PM IST
मुंबई : स्नॅपचॅट इंडियानं आपल्या प्रमुख कार्यक्रम 'स्नॅप विथ स्टार्स'च्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन केलं. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री अनन्या पांडे होते. या दोन्ही स्टार्सनं प्लॅटफॉर्मच्या क्रिएटर कम्युनिटीबरोबर आणि त्यांचा आगामी 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटाच्या रिलीजचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यक्रमात सहभाग घेतला. या विशेष कार्यक्रमात त्यांनी क्रिएटर्ससोबत थेट संवाद साधला, इंटरॅक्टिव्ह गेम्स खेळले आणि सहकार्य वाढवण्यासाठी आयोजित 'स्पीड-डेटिंग' सत्रांमध्येही त्यांनी सहभाग घेतला. दोन्ही कलाकारांनी स्थळी उपलब्ध असलेल्या अनोख्या AR अनुभवांचा आणि इंटरॅक्टिव्ह वैशिष्ट्यांचा देखील आनंद घेतला.
कार्तिक आर्यननं केल्या भावना व्यक्त : या कार्यक्रमात निवडक क्रिएटर्सना उद्योगातील शीर्ष स्टार्सबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळते. हा उपक्रम प्लॅटफॉर्मच्या मुख्य मूल्यांवर आधारित आहे. या उपक्रमाबद्दल कार्तिकनं म्हटलं, "माझा नेहमीच जीवनाकडे सोपा दृष्टीकोन राहिला आहे, खरे रहा, मजा करा, लोकांना हसवा आणि स्वतःला खूप गंभीरपणे घेऊ नका. आज क्रिएटर्सना भेटणे, मजेदार लेंस वापरणे आणि एकत्र ख्रिसमस साजरा करणे म्हणजे मित्रांबरोबर वेळ घालवल्यासारखेच वाटले. आता हेच खरे, रोजचे क्षण माझ्या क्रिएटर्स कम्युनिटीसोबत शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे ,अगदी रिलॅक्स आणि माझ्यासारख्याच पद्धतीनं."
अनन्या पांडेनं केल्या भावना व्यक्त : यानंतर अनन्या पांडेनं आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं, "मी नेहमीच स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. मग ते थोडा मुर्खपणा असणे असो, खूप बोलणे असो किंवा मोठ्या पडद्यावर नेहमी दिसत नाहीत असे छोटे-छोटे क्षण शेअर करणे असो. माझ्यासाठी प्रामाणिकपणा हा फक्त शब्द नाही, लोकांशी जोडण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. आजची प्रेक्षकवर्ग सहजपणे ओळखतो की काय खरे आहे, आणि तीच प्रामाणिकता मला सर्वात जास्त महत्त्वाची वाटते. कार्तिक आर्यनचा 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदा कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. समीर संजय विद्वांस दिग्दर्शित चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा :

