गोव्यामधील फोटो समोर आल्यावर कार्तिक आर्यनच्या कथित गर्लफ्रेंडनं दिली प्रतिक्रिया...
कार्तिक आर्यनच्या कथित गर्लफ्रेंडबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. अभिनेता हा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा या सोशल मीडियावर पसरत आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 7, 2026 at 10:58 AM IST
मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेत्यानं त्याच्या गोव्याच्या सुट्टीमधील सोशल मीडियावर समुद्रकिनाऱ्यावरील एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तो समुद्रकिनाऱ्यावर आराम करत सूर्यास्ताचा आनंद घेत होता. कार्तिकच्या एका साध्या फोटोमुळं इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. आता चाहते सोशल मीडियावर कार्तिकला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत. कार्तिकचा हा फोटो ग्रीसमध्ये राहणारी करीना कुबिलियुटे या तरुणीच्या गोव्यातील फोटोंशी मिळताजुळता आहे. आता सोशल मीडियावर कार्तिक हा रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लावला जात आहे. दरम्यान अभिनेत्याच्या कथित गर्लफ्रेंडबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या यूकेमध्ये शिक्षण घेत आहे.
कार्तिक आर्यनची कथित गर्लफ्रेंड ? : दरम्यान सोशल मीडियावर फोटोमध्ये समान समुद्रकिनाऱ्याचा अँगल आहे. याशिवाय समुद्रकिनाऱ्यावर बेड आणि सारखा टॉवेल देखील असल्याचा दिसत आहे. आता असा दावा केला जात आहे की, दोघेही एकाच हॉटेलमध्ये राहत होते. दरम्यान कार्तिकबद्दल रेडिटवर आणि इतर काही प्लॅटफॉर्मवर याबद्दल चर्चा होत आहे. कार्तिक हा इन्स्टाग्रामवर करीनाला फॉलो करत होता, मात्र त्याच्या नात्याबद्दलच्या अफवा पसरल्यानंतर त्यानं तिला अनफॉलो केले. दरम्यान फोटोमधील समानतेमुळं कार्तिक आणि करीना यांच्यातील नात्याबद्दल ऑनलाइन आताही चर्चा सुरू आहेत. आता सोशल मीडियावर कार्तिकच्या आयुष्यातील रहस्यमय मुलगी असं अनेकजण म्हणत आहेत.
करीना कुबिलियुटेनं दिली प्रतिक्रिया : सोशल मीडियावर कार्तिक आणि करीनाच्या वयाबद्दल देखील चर्चा सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करीना ही कार्तिकपेक्षा 18 वर्षांनी लहान आहे. सध्या कार्तिक 35 वर्षांचा आहे. तूर्त सोशल मीडियावर सुरू असलेला अफवा थांबल्या आहेत. करीनानं स्वत: पुढं येऊन तिच्या आणि कार्तिकच्या नात्याबद्दलच्या दाव्यांना नाकारलं आहे. तिनं सोशल मीडियावर एका पोस्टरवर कमेंट करताना लिहिलं, 'मी त्याची गर्लफ्रेंड नाही. गप्प बसा, लोईस! भावा गप्प बस.' याशिवाय तिनं तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये असं लिहिलं आहे की, 'मी कार्तिकला ओळखत नाही.' आता हे स्पष्ट होत आहे, की कार्तिक आणि करीनामध्ये कुठलंही नाते नाही. हा योगायोग असावा असं सिद्ध होत आहे. फोटो खूप सारखे असल्यानं अफवांना आणखी जोर मिळाला. तसेच कार्तिकनं याबाबत कुठलेही भाष्य केलं नाही. दरम्यान अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर कार्तिक शेवटचा अनन्या पांडेबरोबर 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटामध्ये दिसला होता. हा चित्रपट सरलेल्या वर्षात ख्रिसमसला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. आता पुढे कार्तिक धर्मा प्रॉडक्शनचा 'नागझिला' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक हा इच्छाधारी नागाची भूमिका करणार आहे. हा चित्रपट मृगदीप सिंग लांबा यांनी दिग्दर्शित केला आहे. 'नागझिला' चित्रपट रुपेरी पडद्यावर 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
- कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे अभिनीत 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'चा एक्स रिव्ह्यू, वाचा सविस्तर
- 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे आले एकत्र...
- कार्तिक आर्यन स्टारर 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'मधील टायटल ट्रॅक रिलीज, अभिनेत्यानं शूटिंगचा अनुभव केला शेअर...

