ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यननं केलं 'नागझिला' चित्रपटाचं शूटिंग सुरू, वाचा सविस्तर...

कार्तिक आर्यननं १ नोव्हेंबर रोजी त्याचा आगामी चित्रपट 'नागझिला'चं चित्रीकरण सुरू केलं आहे. या चित्रपटामध्ये तो इच्छाधारी नागाची भूमिकेत दिसणार आहे.

naagzilla movie
'नागझिला' चित्रपट ('नागझिला' चित्रपटाचं पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : November 1, 2025 at 2:14 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - अभिनेता कार्तिक आर्ययनं अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. कार्तिकचा गेल्या वर्षी 'भूल भुलैया ३' आल्यानंतर त्याचा 'नागझिला' हा चित्रपट देखील खूप चर्चेत होता. दरम्यान आता 'नागझिला' या चित्रपटाबद्दल एक अपडेट समोर आली आहे की, या चित्रपटाची शूटिंग कार्तिकनं १ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. या चित्रपटात तो इच्छाधारी नागाची भूमिका साकारणार आहे. 'नागझिला' चित्रपट पुढील वर्षी १४ ऑगस्ट २०२६ रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू करण्यात आलं आहे.

कार्तिक आर्यन आणि राशी खन्ना दिसणार एकत्र : धर्मा प्रॉडक्शनच्या सहकार्यानं हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकच्या 'नागझिला'मध्ये साऊथ अभिनेत्री राशी खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राशीनं यापूर्वी 'द साबरमती रिपोर्ट' आणि 'योद्धा' या दोन वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या कामाचं अनेकांनी खूप कौतुक केलं आहे. दरम्यान कार्तिक आणि राशी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. तसेच अलीकडेच तिनं फरहान अख्तर स्टारर '१२० बहादूर'ही साइन केला आहे, यामध्ये ती एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. तिचा हा चित्रपट १९६२ च्या चीन-भारत युद्धातील रेझांग ला येथील लढाईवर आधारित आहे.

कार्तिक आर्यनचं वर्कफ्रंट : दरम्यान 'नागझिला' २०२६मधील सर्वात बहुचर्चित बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट नाग पंचमीला प्रदर्शित होणार आहे. 'नागझिला' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल असा आता अंदाज व्यक्त केला जात आहे. 'नागझिला' कार्तिक आर्यनचा धर्मा प्रॉडक्शनबरोबरचा दुसरा चित्रपट आहे, त्याचा मागील चित्रपट 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' हा आहे. हा चित्रपट ३१ डिसेंबर २०२५ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो 'आशिकी ३'मध्येही दिसणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. 'मेट्रो इन डिनो'च्या स्क्रिनिंगमध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खानमधील गोंडस क्षण, व्हिडिओ व्हायरल
  2. 'भूल भुलैया 4'बरोबर 'रूह बाबा' पुन्हा परततोय! कार्तिक आर्यननं दिला मोठा इशारा...
  3. श्रीदेवीपासून ते जितेंद्रपर्यंत, कार्तिक आर्यनच्या आधी 'हे' स्टार नाग-नागिनच्या भूमिकेत झळकले, वाचा सविस्तर...