5 चित्रपटांनंतर कारकिर्द संपली ? दोन घटस्फोट झाल्यावर तिसरे लग्न ठरले लकी...
करण सिंग ग्रोव्हर हा त्याचा 44वा वाढदिवस साजरा करत आहे. आता या प्रसंगी आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 23, 2026 at 2:36 PM IST
|Updated : February 23, 2026 at 3:33 PM IST
हैदराबाद - चित्रपटसृष्टीमध्ये असा एक स्टार आहे, ज्यानं छोट्या पडद्यावरून खूप प्रसिद्धी मिळवली. यात शाहरुख खान, विक्रांत मॅसी, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि करण सिंग ग्रोव्हर यांचा समावेश आहेत. त्यातील काही स्टार यशस्वी ठरले, तर काहीना पाहिजे तसं नाव कमावता आले नाही. तसेच या अभिनेत्यानं छोट्यावर खूप प्रसिद्धी मिळावली होती. करण सिंग ग्रोव्हर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील असा एक कलाकार आहे, ज्यानं फक्त 5 चित्रपटांमध्ये काम केलं आहे, मात्र त्यानं चित्रपटसृष्टीत मजबूत पाया रचला नाही. त्याचे एकल चित्रपट फ्लॉप झाले आहेत. दरम्यान करण 23 फेब्रुवारीला 44 वर्षांचा झाला आहे. आता सोशल मीडियाद्वारे त्याला अनेकजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
करण सिंग ग्रोव्हरचं शिक्षण : दिल्लीतील शीख कुटुंबात जन्मलेला करण सिंग ग्रोव्हरचे, कुटुंब हे सौदी अरेबियातील अल खोबर येथे गेले. यानंतर त्यानं सुरुवातीचे शिक्षण त्यानं तिथेच पूर्ण केले, यानंतर तो पुढील शिक्षणासाठी मुंबईत आला. करण सिंग ग्रोव्हरनं IHM मुंबई मधून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली. यानंतर त्यानं ओमानमधील शेरेटन हॉटेलमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काही काळ काम केलं. अभिनेत्याला कधीही चित्रपटसृष्टीत काम करायचे नव्हते, मात्र त्याच्या नशिबानं एक खेळ त्याच्याबरोबर खेळला. 2004 मध्ये, या अभिनेत्यानं मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. यानंतर त्यांची खूप चर्चा होऊ लागली होती. त्यानंतर 2004मध्ये 'कितनी मस्त है जिंदगी' या शोमधून करणनं टीव्ही करिअरची सुरुवात केली. हा शो 2005पर्यंत चालला, यानंतर 2007मध्ये आलेल्या 'दिल मिल गए' या शोमधून करणला ओळख मिळाली. या शोमध्ये त्यानं डॉ. अरमान मलिकची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप पसंत पडली होती. यानंतर मुलींमध्ये त्याची खूप फॅन फॉलोइंग खूप वाढली होती.
करण सिंगनं केलं या शोमध्ये काम : या शोमध्ये त्यांची जोडी ही जेनिफर विंगेटबरोबर होती. 'दिल मिल गए' या शोदरम्यान, करणनं 'नच बलिये' आणि 'झलक दिखला जा'सारख्या शोमध्ये भाग घेतला होता. यानंतर त्याला काम मिळणं बंद झालं होतं. यानंतर 2012 मध्ये सुरभी ज्योतीबरोबर तो 'कुबूल है' शोमध्ये दिसला. त्याचा हा शो देखील खूप हिट ठरला होता. त्याला या शोमधून खूप प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर करणनं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं. तो पहिल्यांदा 2008मध्ये 'भ्रम' चित्रपटात दिसला होता. त्याचा हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. यानंतर तो 2012मध्ये 'आय ए 24'मध्ये दिसला, नंतर तो 2015मध्ये बिपाशा बसूबरोबर 'अलोन' या चित्रपटामध्ये दिसला होता. तो चित्रपट देखील त्याचा फ्लॉप झाला होता. याशिवाय 2015 मध्येच करण सिंग ग्रोवर 'हेट स्टोरी 3'मध्ये दिसला. तसेच 2024मध्ये तो 'फाइटर'मध्ये दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनबरोबर मुख्य भूमिकेत दिसला होता, हा चित्रपट हिट ठरला होता.
करण सिंगची वैयक्तिक आयुष्य : करणचे प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफ जास्त चर्चेचा विषय ठरले होते.अभिनेत्याला त्याच्या आयुष्यात तिन वेळा प्रेम झाले आहेत. करणनं पहिल्यांदा 2008मध्ये अभिनेत्री श्रद्धा निगमबरोबर लग्न केलं, या दोघांचं नात एक वर्षही टिकले नाही. या दोघांचा 2009मध्ये घटस्फोट झाला. यानंतर करणला 'दिल मिल गए' या मालिकेतील जेनिफरशी प्रेम झालं, 2012मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र, त्यांचे वैवाहिक जीवनही चांगले नाही. 2014 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर अभिनेत्याला 'अलोन'च्या सेटवर बिपाशाशी प्रेम झालं. या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघांनी लग्न केलं. सध्या हे जोडपे त्यांची मुलगी देवीबरोबर आनंदी जीवन जगत आहेत.
हेही वाचा :
- करण सिंग ग्रोव्हरनं दोन अयशस्वी घटस्फोटबद्दलचा केला खुलासा - karan singh grover breaks silence
- बिपाशा बसूनं पती करण सिंग ग्रोव्हरबरोबर साजरा केला लग्नाचा 8वा वाढदिवस - BIPASHA BASU AND KARAN SINGH GROVER
- "यू आर माय..."; बिपाशा बसूनं पती करण सिंग ग्रोव्हरला लग्न वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, पोस्ट शेअर - bipasha basu wishes to her husband

