कंगना रणौत विकास बहलबरोबर 'क्वीन'च्या सीक्वेलवर करणार काम...
कंगना रणौत विकास बहलबरोबर 'क्वीन' चित्रपटाच्या सीक्वेलवर काम करणार आहे. याशिवाय अभिनेत्रीनं दिवंगत गायिका आशा भोसले यांची देखील आठवण काढून एक विशेष गोष्ट शेअर केली.

By ETV Bharat Entertainment Team
Published : April 17, 2026 at 10:31 AM IST
मुंबई : विकास बहलचा 2014मध्ये रिलीज झालेला 'क्वीन' या चित्रपटामुळं कंगना रणौतला चित्रपटसृष्टीत एक मोठ स्थान मिळाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात मोठं घर केलं. आता कंगना आणि विकास या चित्रपटाच्या सीक्वेलवर काम करत असल्याचं समोर आलं आहे. कंगनानं 'क्वीन 2' या चित्रपटाला दुजोराही दिला आहे. याशिवाय अभिनेत्रीनं बोलताना आशा भोसले यांच्या 'हंगामा हो गया' गाण्यावर नाचल्याच्या आठवणींना देखील उजाळा दिला. तसेच कंगनाच्या 'क्वीन' चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल सांगायचं झालं तर, याची आणखी काही माहिती समोर आली नाही. दरम्यान अनेक वर्षांनंतर, कंगना आणि विकास या चित्रपटाच्या सीक्वेलवर काम करत आहेत. त्यामुळं कंगनाचे चाहते देखील खूप खुश झाले आहेत.
कंगना रणौतनं केली 'क्वीन'च्या सीक्वेलची पुष्टी : दरम्यान कंगनानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, ती अभिनय करेल. याशिवाय तिनं या चित्रपटाबद्दल बाकी इतर माहिती शेअर केली नाही. यानंतर 'क्वीन 2' चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले का, याबद्दल विचारल्यावर तिनं दिग्दर्शक विकास बहल यांच्याबरोबर काम करत असल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, "विकास बहल आणि मी एकत्र येत आहोत, याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही. हो, मी पुन्हा अभिनय करत आहे." कंगनानं पहिल्या चित्रपटात काम करतानाचे अनुभव सांगितला आणि गायक आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. तिनं पुढं म्हटलं, तिला चित्रपटात आशाताईंच्या प्रसिद्ध 'हंगामा हो गया' गाण्यावर डान्स करण्याची संधी मिळाली होती. कंगनानं पुढं म्हटलं, "माझ मन तुटलं आहे. या नुकसानीमुळं मला खूप दुःख झालं आहे, कारण अशी माणसे शतकातून एकदाच जन्माला येतात." असे लोक पुन्हा जन्माला येत नाहीत.
आशा भोसले याबद्दल एक विशेष गोष्ट केली शेअर : कंगनानं सांगितलं, जेव्हा आम्ही 'क्वीन' बनवत होतो, त्यावेळी आम्हाला चित्रपटात 'हंगामा' हे गाणं समाविष्ट करायचं होतं आणि विकासनं ते पुन्हा रेकॉर्ड करण्याचा सल्ला दिला. मी म्हटलं, "तुम्ही असा आवाज काढू शकत नाही. तुम्हाला तसा आवाज पुन्हा मिळणार नाही. म्हणून, आम्ही ते गाणं आशाजींच्या आवाजात पुन्हा तयार केले." आशाताईंनी गायलेलं हे गाणं प्रेक्षकांना खूप जबरदस्त वाटलं. दरम्यान प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं 12 एप्रिल रोजी निधन झालं. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळं त्याचं निधन झाल्याचं समोर आलंय. दरम्यान कंगनाच्या 'क्वीन'साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. येणाऱ्या सीक्वेलबद्दल देखील चित्रपट धमाकेदार असणार हीच लोकांना अपेक्षा आहेत.

