जावेद अख्तर एआय व्हिडिओ पाहिल्यानंतर संतापले, केली नाराजी व्यक्त, कायदेशीर कारवाईची दिली धमकी...
ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांचा एआय-निर्मित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 2, 2026 at 11:54 AM IST
मुंबई : प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ते देवाला स्वीकारल्याचा दावा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जावेद अख्तर यांनी एक 'एक्स' (आधीचं ट्विटर) समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी एआय व्हिडिओबद्दलचे सत्य उघड केलं आहे. त्यांनी या व्हिडिओला फेक असल्याचं आणि एआयद्वारे बनवण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या होत्या.
जावेद अख्तर यांची डीपफेक व्हिडिओवर टीका : जावेद अख्तर यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिलं, एक बनावट व्हिडिओ फिरत आहे, ज्यामध्ये मी टोपी परिधान केलेला दिसत आहे. संगणकाच्या मदतीने ती प्रतिमा तयार करण्यात आली आहे. शिवाय, त्यात असा दावा केला जात आहे की, मी शेवटी देवाला स्वीकारलं आहे.' त्यापुढे ते लिहितात, 'हे मूर्खपणाचं आहे. मी या प्रकरणाची सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा गंभीरपणे विचार करत आहे आणि शेवटी या बनावट बातमीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला आणि माझ्या प्रतिष्ठा आणि विश्वासार्हतेला हानी पोहोचवणाऱ्या काही लोकांना न्यायालयात खेचणार आहे.' आता जावेद अख्तर यांची ही पोस्ट समोर आल्यावर, अनेकजण त्यांच्या पोस्टवर कमेंट्स देत आहेत. एका यूजरनं यावर लिहिलं आहे, 'साहेब, आदरानं सांगायचं झालं तर, टोपी घालल्यानं माणूस धार्मिक होतो का? हो, पण बरेच लोक इतरांना टोपी घालायला लावून देव बनवतात हे निश्चितच आहे..' दुसऱ्या आणखी एकानं लिहिलं, 'जावेद साहेब, तुम्हाला हरवण्यासाठी हे लोकांचे डावपेच आहेत, त्यांना माहित नाही की ते कोणाशी डील करत आहेत, तुम्हाला शुभेच्छा.'
A fake video is in circulation showing my fake computer generated picture with a topi on my head claiming that ultimately I have turned to God . It is rubbish . I am seriously considering to report this to the cyber police and ultimately dragged the person responsible for this…
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 1, 2026
जावेद अख्तरची डिबेट : दरम्यान, गेल्या महिन्यात जावेद अख्तर यांना एका डिबेट शोमध्ये 'देव अस्तित्वात आहे का?' याबद्दल काही गोष्टी विचारण्यात आल्या होत्या. या शोमध्ये मुफ्ती शमील नदवी या इस्लामिक व्यक्तीनं यांच्याविरुद्धच्या वादविवादात काही गोष्टी समोर मांडल्या होत्या. या गोष्टींना अख्तर यांनी योग्य पद्धतीनं उत्तर दिलं होतं. या वादविवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आहे. दरम्यान हा व्हिडिओ पाहिल्यांवर अनेकांनी जावेद अख्तर यांचं कौतुक केलं होतं, तर काहींनी त्यांना ट्रोल केलं होतं. दरम्यान मुफ्ती शमील नदवीबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं पूर्ण नाव शमील अहमद अब्दुल्ला आहे. ते इस्लामिक धार्मिक कुटुंबातून आहे. त्यांनी लहानपणापासूनच धर्माचा मार्ग अवलंबला. त्यांनी इस्लामिक धर्मशास्त्र, हदीस, कुराण आणि इस्लामिक कायद्याचं ज्ञान मिळवलं आहे.
हेही वाचा :

