ऑस्करच्या टॉप 15मध्ये ईशान खट्टर आणि विशाल जेठवा अभिनीत 'होमबाउंड' चित्रपट, वाचा सविस्तर...
बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'होमबाउंड' हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत पुढं गेला आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 6, 2026 at 10:49 AM IST
मुंबई - नीरज घायवान दिग्दर्शित 'होमबाउंड' चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट सध्या ऑस्कर अवार्ड जिंकण्याच्या शर्यतीत आहे. आता या चित्रपटाबद्दल एक अपडेट समोर आली आहे. 'होमबाउंड' 97व्या अकादमी पुरस्कारांच्या शर्यतीत पुढे गेला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या श्रेणीत 15 निवडलेल्या, चित्रपटांमध्ये याचे नाव समाविष्ट झालं आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS)नं अलीकडेच शॉर्टलिस्टची घोषणा केली, यात मतदानामुळं पुढं जाणाऱ्या भारतीय चित्रपटाबद्दल सांगण्यात आलं आहे. हा एक आता भारतीय चित्रपटासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. 2026चे ऑस्कर काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. दरम्यान शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांसाठी मतदान आधीच सुरू आहे.
'होमबाउंड' झाला शॉर्टलिस्ट : 2026च्या अकादमी पुरस्कारांच्या पुढील मतदान फेरीत 'इंडियाज होमबाउंड' हा चित्रपट पोहोचला आहे. आता या चित्रपटानं एक पाऊल शर्यतीत पुढं नेलं आहे, त्यामुळं करण जोहरनं इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये निर्मात्यानं स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात काही देशांची नावे देण्यात आली आहे. यामध्ये भारताचं नाव देखील आहे. दरम्यान शॉर्टलिस्टमधील 15 इतर प्रशंसित आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये 'इंडियाज होमबाउंड' आहे. आता या आनंदाच्या बातमीमुळं करणसह चित्रपटसृष्टीतील अनेकजण खुश झाले आहेत. दरम्यान ऑस्कर नामांकनांची घोषणा गुरुवार म्हणजेच 22 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. तसेच द अकादमीच्या अधिकृत एक्स हँडलनं एक अपडेट शेअर करून माहिती दिली की 'होमबाउंड'ला अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) च्या शॉर्टलिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये पंधरा चित्रपट मतदानाच्या पुढील फेरीत पोहोचला आहे. ते नकाशावर येथे आहेत," असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. आता भारत हा एका प्रमुख श्रेणीमध्ये ऑस्कर जिंकू शकतो.

'होमबाउंड'बद्दल : 'होमबाउंड'मध्ये ईशान खट्टर आणि विशाल जेठवा मुख्य भूमिकेत आहेत. दुसरीकडे जान्हवी कपूर सहाय्यक भूमिकेत आहे. हा चित्रपट बालपणीचे मित्र शोएब (ईशान खट्टर) आणि चंदन (विशाल जेठवा) यांच्या संघर्षांभोवती फिरते, ज्यांना पोलीस दलात सामील होण्याचं असते. यामुळं त्यांना समाजात सन्मानानं पाहिले जाईल, यासाठी ते खूप प्रयत्न करतात. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अदर पूनावाला आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे, तर मारिजके डीसूझा आणि मेलिटा टोस्कॅन डू प्लांटियर हे सह-निर्मिते आहेत, आणि मार्टिन स्कॉर्सेस आणि प्रवीण खैरनार कार्यकारी निर्माते आहेत. तसेच 15 मार्च रोजी म्हणजेच संध्याकाळी डॉल्बी थिएटरमध्ये रेड कार्पेट सोहळा पार पडेल, ज्याचे सूत्रसंचालन कोनन ओ'ब्रायन करणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार, हा कार्यक्रम 16 मार्च रोजी पहाटे 4:30 वाजता सुरू होईल आणि सकाळी 7:30 पर्यंत चालेल.
'होमबाउंड' व्यतिरिक्त, इतर चित्रपटांमध्ये यांचा समावेश
- अर्जेंटिना - बेलेन
- ब्राझील - द सिक्रेट एजंट
- फ्रान्स - इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट
- जर्मनी - साउंड ऑफ फॉलिंग
- भारत - होमबाउंड
- इराक - द प्रेसिडेंट्स केक
- जपान - कोकुहो
- जॉर्डन - ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू
- नॉर्वे - सेंटीमेंटल व्हॅल्यू
- पॅलेस्टाईन - पॅलेस्टाईन ३६
- दक्षिण कोरिया - नो अदर चॉइस
- स्पेन - सिरात
- स्वित्झर्लंड - लेट शिफ्ट
- तैवान - लेफ्ट-हँडेड गर्ल
- ट्युनिशिया - द व्हॉइस ऑफ हिंद रजब
हेही वाचा :
- २०२६च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी 'होमबाउंड'ची निवड, अंतिम यादी 'या' दिवशी होईल जाहीर
- आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत 'होमबाउंड'नं पटकावलं स्थान, वाचा सविस्तर...
- 'चार वर्षे सुट्टी घेतली नाही' : 'होमबाउंड'ला कान्समधील प्रेक्षकांकडून ९ मिनीटांची स्टँडिग ओव्हेशन, नीरज घायवान झाला भावूक

