'हेलो बच्चों' सीरीजचा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ...
शिक्षक फिजिक्सवाला यांच्यावर आधारित 'हेलो बच्चों' सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 28, 2026 at 5:12 PM IST
|Updated : February 28, 2026 at 5:18 PM IST
हैदराबाद : लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि शिक्षक फिजिक्सवालावर आधारित 'हेलो बच्चों' या वेब सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीव्हीएफ आणि नेटफ्लिक्स या बहुप्रतीक्षित सीरीजमध्ये मुख्य भूमिकेत विनीत कुमार सिंग दिसणार आहेत. टीव्हीएफ आणि नेटफ्लिक्स फिजिक्सवालाचे सीईओ आणि शिक्षक अलख पांडे यांचा जीवनातील प्रवास हा प्रेक्षकांना आता पाहायला मिळणार आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण याला पाहण्यासाठी आतुर आहेत. जवळजवळ 2.25 मिनिटांचा या ट्रेलरमध्ये शिक्षकांची आणि अभियंते आणि डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलांची कहाणी पाहायला मिळते.
'हेलो बच्चों' या वेब सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित : या सीरीजमध्ये कोविड -19 साथीच्या काळात देशाच्या शिक्षणाची अवस्था कशी होती हे दाखविण्यात येणार आहे. देशभरात' फिजिक्सवाला' म्हणून ओळखले जाणारे अलख पांडे अनेकदा त्यांच्या व्हिडिओंमध्ये 'हेलो बच्चों' असे म्हणून विद्यार्थ्यांचे स्वागत करतात. या सीरीजचे नाव देखील तेच ठेवण्यात आलं आहे. पांडे हे 'कोविड-19' महामारीच्या काळात देशाच्या शिक्षण व्यवस्थेला आकार देणारे शिक्षक ठरले. या सीरीजचा ट्रेलर आपल्याला काही काळ मागे घेऊन जातो आणि वास्तविक जीवनातील प्रशिक्षक 'फिजिक्सवाला'चा प्रवास दाखवतो. दरम्यान रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये एक शिक्षक सर्वात गरीब मुलांसाठी एका आशेची किरण बनून उदयास येतो, असं दाखवलं गेलय.
'हेलो बच्चों' वेब सीरीजमधील स्टारकास्ट : दरम्यान अलख पांडे यांची कहाणी एका लहान वर्गात सुरू झाली. ट्रेलरमध्ये विविध पार्श्वभूमीतील मुलांच्या कथा देखील दाखवल्या आहेत. 'कोटा फॅक्टरी' आणि 'अॅस्पिरंट्स' सारख्या दमदार सीरीजनंतर, टीव्हीएफची नवीन सीरीज 'हेलो बच्चों' प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ही सीरीज पुढील महिन्यात, 6 मार्च 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या सीरीजमध्ये विनीत सिंग व्यतिरिक्त विक्रम कोचर, गिरिजा ओक, सत्येंद्र सोनी, सोनू कुमार यादव आणि अवतार वैष्णानी हे कलाकार आहेत. आता या 'हेलो बच्चों' सीरीजचा ट्रेलर पाहून यूजर्स चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत.

