'हनुमान अंश'नं 1800 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या 'धुरंधर 2'ला टाकलं मागं...
'हनुमान अंश' 2026चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. यानं आता 'धुरंधर 2'लाही मागं टाकलंय.

By ETV Bharat Entertainment Team
Published : September 3, 2026 at 1:55 PM IST
हैदराबाद : नीम करोली यांच्या जीवनावर आधारित 'हनुमान अंश' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. हा चित्रपट 2 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला. या चित्रपटानं नफ्याच्या बाबतीत भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठ्या नावांनाही मागे टाकलंय. 'हनुमान अंश' 2026 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला असून त्यानं नफ्याच्या बाबतीत 'धुरंधर 2'ला मागे टाकलंय. चित्रपटाची प्रभावी कमाई आणि लोकप्रियता इतकी जास्त वाढली आहे, की याला पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहेत. तसेच हा चित्रपट आता जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आतापर्यंत 'हनुमान अंश'नं किती नफा कमावला आहे.
'हनुमान अंश'नं अधिक नफा कमावला : 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर 2'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1149.30 कोटींची कमाई केली. देशात इतर कोणत्याही भारतीय चित्रपटानं इतकी कमाई केलेली नाही. 'हनुमान अंश'ची देशांतर्गत कमाई 'धुरंधर 2' पेक्षा खूपच कमी असली तरी, त्यानं नफ्याच्या बाबतीत त्याला मागे टाकलं. हा चित्रपट आता चर्चेचा विषय बनला आहे. फक्त 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'हनुमान अंश'नं भारतात आतापर्यंत 61.88 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटानं 2000% पेक्षा जास्त नफा कमावला आहे, तर 'धुरंधर 2'नं 1000% नफा कमावला आहे.
हनुमान अंशच्या नफ्याचे गणित
खर्च (बजेट): 2 कोटी
एकूण कमाई: 61 कोटी
नफा: 61 कोटी - 2 कोटी = 59 कोटी
नफ्याची टक्केवारी: 2950%
सॅकनिल्कनुसार 'हनुमान अंश'ची कमाई
1 दिवस (पहिला शुक्रवार) 10 लाख
2 दिवस(पहिला शनिवार) 20 लाख
3 दिवस (पहिला रविवार) 30 लाख
4 दिवस (पहिला सोमवार) 10 लाख
5 दिवस(पहिला मंगळवार) 13 लाख
6 दिवस(पहिला बुधवार) 13 लाख
7 दिवस (पहिला गुरुवार) 12 लाख
पहिल्या वीकेंडची कमाई
1.08 कोटी
8 दिवस (दुसरा शुक्रवार) 4 लाख
9 दिवस (दुसरा शनिवार) 8 लाख
10 दिवस (दुसरा रविवार) 8 लाख
11 दिवस (दुसरा सोमवार) 5 लाख
12 दिवस (दुसरा मंगळवार) 5 लाख
13 दिवस (दुसरा बुधवार) 5 लाख
14 दिवस (दुसरा गुरुवार)5 लाख
दुसऱ्या वीकेंडची कमाई
40 लाख
15 दिवस तिसरा शुक्रवार) 15 लाख
16 दिवस (तिसरा शनिवार) 85 लाख
17 दिवस तिसरा रविवार) 2.20 कोटी
18 दिवस (तिसरा सोमवार) 1.25 कोटी
19 दिवस (तिसरा मंगळवार) 2.35 कोटी
20 दिवस (तिसरा बुधवार) 1.50 कोटी
21 दिवस (तिसरा गुरुवार) 2.10 कोटी
तिसऱ्या वीकेंडची कमाई
10.40 कोटी
22 दिवस (चौथा शुक्रवार) 6.25 कोटी
23 दिवस (चौथा शनिवार) 9.25 कोटी
24 दिवस (चौथा रविवार) 12.75 कोटी
25 दिवस (चौथा सोमवार) 5.50 कोटी
26 दिवस (चौथा मंगळवार) 8.50 कोटी
27 दिवस (चौथा बुधवार) 7.75 कोटी
चित्रपटाची एकूण कमाई : 61.88 कोटी
'हनुमान अंश'बद्दल :'हनुमान अंश'चे दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केलं आहे. दिग्दर्शकानं चित्रपटाची कथाही लिहिली आहे. या चित्रपटात शोभिनव सत्य, चंदन आनंद, पूर्णिमा तिवारी आणि विहान शेडगे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. महाराजजींची भूमिका शोभिनव सत्य यांनी केली आहे. चित्रपटाचा कालावधी 150 मिनिटे आहे. चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळं आणि वाढत्या कमाईमुळं, तो आता जगभरात प्रदर्शित होत आहे. 'हनुमान अंश' जगभरात 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होत आहे.

