हृतिक रोशनला वाढदिवसानिमित्त वडील राकेश रोशननं दिल्या गोड शुभेच्छा, पोस्ट व्हायरल
हृतिक रोशन आज 10 जानेवारी रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी अभिनेत्याच्या वडिलांनी त्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 10, 2026 at 3:55 PM IST
मुंबई - बॉलिवूड स्टार अभिनेता हृतिक रोशन आज, शनिवारी त्याचा 52वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी सोशल मीडियावर चाहते आणि बॉलिवूड स्टार्स त्याला शुभेच्छा देत आहेत. आता हृतिकचे वडील आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनीही आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राकेश रोशन यांनी इंस्टाग्रामवर हृतिकचा एक एआय-जनरेटेड फोटो शेअर केला आहे, यामध्ये तो त्याच्या बालपण आणि तारुण्यात असल्याचा दिसत आहे. राकेश रोशननं फोटो शेअर करताना लिहिलं, 'डग्गू, मी तुला दरवर्षी अधिक प्रेम करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा.'
चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव : कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी हृतिकवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या पोस्टमध्ये एका चाहत्यानं लिहिलं, 'तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि कृपया ' क्रिश 4'ची घोषणा करा.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हृतिक. तुम्हाला भरपूर आनंद आणि आरोग्य लाभो. देव तुमचे कल्याण करो.'आणखी एकानं लिहिलं, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हृतिक. तू अनेकांसाठी जसा प्रेरणास्रोत आहेस, तसाच राहा आणि नेहमी प्रेरित होत राहा.' याशिवाय अनेकजण या पोस्टमध्ये फायर आणि इमोजी शेअर करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. हृतिक रोशनचा चाहतावर्ग खूप मोठा आहे, त्यामुळं काहीजण त्याचा फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
वडील-मुलाचं प्रेम : दरम्यान राकेश रोशन आणि हृतिकमध्ये वडील-मुलाचे बंधनच नाही तर त्यांच्यात चांगली मैत्री देखील आहे. प्रत्येक वादात राकेश रोशन नेहमीच आपल्या मुलाबरोबर खंबीरपणे उभे राहिले आहेत. कंगनाबरोबर त्यांचे प्रेमसंबंध असो किंवा सुझान खानसोबतचा घटस्फोट असो, राकेश रोशन यांनी नेहमीच हृतिकला पाठिंबा दिला आहे. दरम्यान हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटावर राकेश रोशन यांनी सांगितलं की, त्यांच्यामध्ये काय झालं हे त्यांना देखील माहित नाही. आधी प्रेम होते, नंतर गैरसमज आणि शेवटी घटस्फोट झाला. त्यावेळी आम्हाला त्यांचे नाते सांभाळावे लागले, मात्र आताही सुझान आमच्या कुटुंबाचा भाग आहे. दरम्यान हृतिक वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर त्यानं चित्रपटसृष्टीत बाल कलाकार म्हणून पाऊल ठेवलं होतं. यानंतर त्यांचा हिरो म्हणून 'कहोना प्यार है' चित्रपट आला, अभिनेत्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अमिषा पटेल देखील मुख्य भूमिकेत होती. आता शेवटी अभिनेता 'वॉर 2' या चित्रपटामध्ये दिसला होता.
हेही वाचा :

