जेनेलिया देशमुखनं भावाबरोबर रक्षाबंधन सण केला साजरा...
जेनेलिया देशमुखनं सोशल मीडियावर रक्षाबंधन सणानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती आपल्या भावाबरोबर उत्सव साजरा करताना दिसत आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : August 28, 2026 at 2:36 PM IST
हैदराबाद : अभिनेत्री जेनेलिया देशमुखनं भाऊ नायजेल डिसूझा यांच्यासोबतच्या रक्षाबंधन उत्सवाची झलक दाखवली आहे. अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर रक्षाबंधन उत्सवाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आधी आपल्या भावाला राखी बांधताना दिसत आहे आणि त्यानंतर दोघेही एका लिफाफ्यावरून मजेशीर भांडण करताना दिसत आहे. भेटवस्तू देणे आणि लाड पुरवणे यावरून होणाऱ्या 'वार्षिक भांडणा'बद्दल जेनेलियानं मजेशीर भाष्य केलंय.
जेनेलिया देशमुखनं शेअर केली पोस्ट : तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'ते वार्षिक भांडण. भेटवस्तू देणे आणि लाड पुरवणे हे नेहमीच मोठ्या बहिणीचं काम असतं, उलट कधीच होऊ शकत नाही - तसे चालत नाही. पण यावेळी 'निगू पिगू'नं लहान मुलांच्या टोळीची मदत घेतली आणि मी पूर्णपणे हरले, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा निगू पिगू. मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहीन.' दरम्यान जेनेलियाबद्दल सांगायचं झालं तर ती लवकरच राम गोपाल वर्मा यांच्या 'पोलीस स्टेशन में भूत' या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटात मनोज बाजपेयीबरोबर दिसणार आहे. जेनेलिया आणि मनोज हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे. याशिवाय ती इमरान हाश्मीच्या 'गनमास्टर जी9'मध्येही दिसणार आहे. 25 ऑगस्ट रोजी अभिनेत्यानं त्याच्या या आगामी ॲक्शन-एंटरटेनर चित्रपटाची पहिली झलक शेअर केली होती. दरम्यान आदित्य दत्त दिग्दर्शित हा 'ॲक्शन-रोमान्स' चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल : तसेच जेनेलिया देशमुखन शेवटी 'राजा शिवाजी' या चित्रपटामध्ये पती रितेश देशमुखबरोबर दिसली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटामध्ये रितेशनं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये रितेश आणि जेनेलिया व्यतिरिक्त विद्या बालन , महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, अभिषेक बच्चन आणि संजय दत्त दिग्गज कलाकारांचा भव्य ताफा पाहायला मिळाला.

