'लॉक अप 2' शोमध्ये गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला येईल आमनेसामने, घटस्फोटाच्या बातम्या आहेत खोट्या?
'लॉक अप 2' शोमध्ये गौरव खन्ना हा पाहुणा म्हणून पत्नी आकांक्षा चमोलाला भेटण्यासाठी येत आहे. घटस्फोटाच्या बातम्यादरम्यान त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : July 9, 2026 at 11:35 AM IST
हैदराबाद : नेटफ्लिक्सचा शो 'लॉकअप: ट्रुथ ऑर सजा' हा शो आकांक्षा चमोलामुळं खूप चर्चेत आहे. या शोमध्ये आकांक्षाशिवाय योगेश रावत, श्रेया कालरा, राम कपूर. हर्षद चोप्रा, शिवांगी जोशी आणि अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. दरम्यान या शोमध्ये आकांक्षानं खुलासा केला होता की, ती आणि तिचा पती गौरव खन्ना हा जवळपास एक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांचा घटस्फोट होणार असल्याचा देखील तिन या शोमध्ये सांगितलं होतं. यानंतर गौरवच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. तसेच अभिनेत्रीनं आणखी एक खुलासा केला होता की, ती बायसेक्शुअल असून स्त्रियांकडे आकर्षित होते. दरम्यान आकांक्षाच्या या खळबळजनक खुलाशांनंतर गौरव खन्ना या शोमध्ये पाहुणा म्हणून प्रवेश करणार आहे.
'लॉक-अप सीझन 2'मध्ये गौरव खन्ना करणार प्रवेश : सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये हसतमुखानं गौरव हा 'लॉक-अप सीझन 2'च्या घरातमध्ये जात आहे. यानंतर अनेकजण घरामध्ये कोण आलं याबद्दल चर्चा करताना दिसतात. तसेच व्हिडिओमध्ये गौरव आणि आकांक्षा एकमेकांसमोर उभे असल्याचे दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर गौरव आणि आकांक्षा यांचा घटस्फोट हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं अनेकजण म्हणताना दिसत आहेत. दरम्यान शोमध्ये गौरव आलेला पाहून आकांक्षा ही भावूक होताना दिसली. तसेच शोची टीआरपी वाढविण्यासाठी निर्मात्यांनी गौरव आणि आकांक्षाच्या घटस्फोटाची स्क्रिप्ट रचली असल्याचं प्रेक्षकांना वाटत आहेत.
प्रोमो व्हायरल : व्हिडिओमध्ये गजांआडून गौरवनं आपल्या पत्नीच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, "तू हे करून दाखवलंस!" प्रोमोमध्ये फक्त एवढेच दाखवण्यात आलं आहे. व्हिडिओत या कपलमध्ये कुठलाही दुरवा असल्याचा दिसत नाही, ज्यामुळं या दोघांमध्ये सर्वकाही ठीक असल्याचा अंदाज प्रेक्षक लावत आहेत. दरम्यान 27 जून 2026 रोजी 'लॉक अप 2'च्या प्रीमियर दरम्यान, आकांक्षानं खुलासा केला की, लग्नाच्या नऊ वर्षांनंतर ती आणि गौरव घटस्फोट घेत आहेत. तसेच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये अभिनेत्री असं म्हणताना दिसत आहे की, ती प्रेमामध्ये खूप दुर्दैवी आहे. आता आकांक्षाच्या वक्तव्यामागील सत्य शो आणि या एपिसोडमध्ये कळण्याची शक्यता आहे. दरम्यान या जोडप्याचं लग्न 24 नवंबर 2016 कानपुरमध्ये झालंय.

