संजय लीला भन्साळी यांना हृदयविकाराचा झटका ? अधिक माहिती येथे वाचा...
संजय लीला भन्साळी यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. आता याबद्दल एक माहिती समोर आली आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 25, 2026 at 2:24 PM IST
मुंबई : निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर त्यांना तत्काळ मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असं म्हटलं जात होतं. संजय लीला भन्साळींबद्दलच्या पसरलेल्या या धक्कादायक माहितीमुळे त्यांचे चाहते त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करू लागले होते. नुकताच त्यांचा 24 फेब्रुवारी 2026 रोजी वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक स्टार्सनं त्यांना शुभेच्छा दिल्या.हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातमीमुळे चिंतेचं वातावरण होतं. मात्र ईटीव्ही भारतनं भन्साळींच्या टीमशी संपर्क साधला असताना त्यांनी सांगितलं की, हे वृत्त खोटे आहे.
संजय लीला भन्साळी यांना हृदयविकाराचा झटका ? : निर्मात्याच्या टीमकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, 'भन्साळींच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. अशा कोणत्याही बातम्या प्रसारित करू नका, कारण त्यांचा कोणताही व्हेरिफाईड स्रोत नाही, असं म्हणत त्यांच्या टीमनं अफवा न पसरवण्याची विनंती केली. दरम्यान मंगळवारी त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान भन्साळी यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सोशल मीडियावर खूप वेगाने फिरत होती. मात्र त्यांच्या टीमनं हे वृत्त खोटं असल्याचं सांगून यावर पूर्णविराम लावला आहे. याशिवाय रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच भन्साळी प्रॉडक्शन्सनं काही ते ठिक असल्याचे आणि रुटीन चेकअपसाठी गेल्याचं देखील आता इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलंय. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

संजय लीला भन्साळी यांचं हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान : भन्साळी यांनी हिंदी सिनेसृष्टीत क्लासिक चित्रपट दिले आहेत. त्यांनी 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'बाजीराव मस्तानी' आणि 'गंगूबाई काठियावाडी' सारखे चित्रपट निर्माण केले आहेत. त्यांचं नाव दिग्गज फिल्ममेकर्समध्ये घेतलं जाते. भन्साळींच्या चित्रपटांचे सेट्स एवढे भव्य असतात की त्यात एखादा अख्खा चित्रपट निर्माण होईल. भन्साळी हे त्यांच्या चित्रपटांसाठी भव्य सेट्स तयार करतात. त्यांच्या 'देवदास' या चित्रपटाचं बजेट त्याकाळात 55 कोटी रुपये असल्याची चर्चा होती. याशिवाय त्यांनी 'हीरामंडी' या वेब सीरीजसाठी देखील खूप पैसे लावले होते, या सीरीजमधील भव्य सेट आणि डिझानर कपडे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान भन्साळी यांच्या आईनं आपल्या दोन मुलांना वाढवण्यासाठी संघर्ष केला, असं नेहमी ऐकायला मिळते, ते त्यांच्या आईला खूप मानतात. तसेच भन्साळींच्या जवळजवळ सर्व चित्रपटांमधले पुरुष भावनिकदृष्ट्या तुटलेले असतात, तर महिलांना सशक्त आणि शक्तिशाली म्हणून सादर केलं जातं. 'पद्मावती' आणि 'रामलीला', दोन्ही चित्रपटांमध्ये महिला पात्र नायकाला तुल्यबळ होती.
हेही वाचा :

