'धुरंधर 2' चित्रपटाचं कौतुक करत राम गोपाल यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला केला प्रश्न, वाचा सविस्तर
'धुरंधर 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. आता या चित्रपटाचं कौतुक दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : March 30, 2026 at 11:35 AM IST
|Updated : March 30, 2026 at 12:22 PM IST
मुंबई - 'धुरंधर 2' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. या चित्रपटाची चर्चा ही सर्वत्र होत आहे. दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी एक असे वक्तव्य केलं आहे, ज्यानं हिंदी चित्रपटसृष्टीचं लक्ष वेधून घेतलं आहे. एवढा मोठा हिट चित्रपट होऊनही इंडस्ट्रीतील बहुतेक लोक गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आता त्यांच्या मते शांतता आश्चर्यकारक असून अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.
राम गोपाल वर्मानं केलं आदित्य धरच्या चित्रपट 'धुरंधर 2'चं कौतुक : 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले मत व्यक्त करत राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं की, 'आदित्य धरच्या चित्रपटानं इंडस्ट्रीत मोठी खळबळ माजवली आहे, तरीही कोणीही उघडपणे त्याचे कौतुक करत नाहीये. कदाचित चित्रपटाचे यश इतके मोठे आहे की इतरांना काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहीये, किंवा ते त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते, काही लोक हा केवळ एक ट्रेंड आहे जो लवकरच संपेल असे समजून गप्प बसले आहेत, पण हा विचार चुकीचा आहे. त्यांनी या चित्रपटाला 'डायनासोर' म्हणत ते की, चित्रपट इतका मोठा आणि शक्तिशाली आहे की, त्याकडे दुर्लक्ष करणं हे मूर्खपणाचे ठरेल. जर चित्रपटसृष्टीतील सदस्यांनी याला गांभीर्यानं घेतलं नाही, तर ते मागे पडू शकतात. वर्मा यांनी सल्ला दिला की, त्यांनी या चित्रपटातून काहीतरी नवीन शिकले पाहिजे, कारण तो चित्रपट निर्मितीची एक नवीन पातळी दाखवतो. याशिवाय राम गोपाल वर्मा यांनी आर. माधवचं देखील कौतुक केलं आहे. तसेच अभिनेत्यानं यावर आभार देखील मानलं आहे.
Now that @AdityaDharFilms has EXPLODED a ATOMIC BOMB right under the film industry, what is shocking is the loud silence from the rest of the film industry .
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 29, 2026
I don’t know whether this is because the #Dhurandhar2 ‘s devastating explosion has hurled everyone else in the film…
Hey the fact that something I said gave you the courage to keep making those “crazy” choices is bull shit because my praise came from the fact that you already did it and achieved . In this industry, like you very well know , most actors what they think is the safest path is… https://t.co/i6JEsSBwvX
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 29, 2026
चित्रपटाला मिळाले प्रचंड यश : रणवीर सिंग-अभिनीत 'धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले विक्रम करत आहे. या चित्रपटानं काही दिवसांतच, 1200 कोटींहून अधिक कमाई केली आहे, आता हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे. 'धुरंधर 2' चित्रपटात संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, अक्षय खन्ना, गौरव गेरा आणि सारा अली खान यांच्या विशेष भूमिका आहेत. या चित्रपटात अॅक्शन आणि जबरदस्त अभिनय असल्यामुळं यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट लोकांना खूप आवडत आहे. हा चित्रपट लवकरच 2000 कोटींचा आवडा पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

