महिमा चौधरी केलं संजय मिश्राबरोबर लग्न ? जाणून घ्या सत्य...
महिमा चौधरी आगामी चित्रपट 'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी'मुळं चर्चेत आहे. तिचा संजय मिश्राबरोबरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यामध्ये ती वधूच्या लूकमध्ये आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : October 30, 2025 at 12:28 PM IST
मुंबई - अभिनेत्री महिमा चौधरीच्या नावाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ५२ व्या वर्षी महिमा ही वधूच्या लूकमध्ये ज्येष्ठ अभिनेता संजय मिश्राबरोबर पोझ देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये संजय मिश्रा आणि महिमा चौधरी एकमेकांशी प्रेमाने बोलत आहेत. आता त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियावर प्रश्न विचारताना दिसत आहे की, अभिनेत्रीनं पुन्हा विवाह केला का? आता खरच अभिनेत्रीनं पुन्हा विवाह केला का? याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
माहिमा चौधरीनं केलं दुसरे लग्न ? : दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माहिमा चौधरी नवविवाहित वधूसारखी संजय मिश्राबरोबर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. दरम्यान महिमा चौधरीने दुसरे लग्न केलेले नाही. 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळं ती सध्या आपल्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. आता महिमाच्या या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, महिमा चौधरी वधूच्या लूकमध्ये, तर संजय मिश्रा वराच्या पोशाखात असल्याचे दिसत आहेत. आता या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
'दुर्लभ प्रसादचे दुसरे लग्न' चित्रपटाचं प्रमोशन : एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संजय मिश्रा आणि महिमा पापाराझींसाठी एकत्र पोझ देत आहेत. आता या चित्रपटाचं असं प्रमोशन केल्यामुळं अनेकजण महिमा आणि संजय मिश्रा यांचं सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. दरम्यान महिमा चौधरीनं अलीकडेच तिच्या आगामी चित्रपट 'दुर्लभ प्रसादचे दुसरे लग्न'चं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. यामध्ये संजय मिश्रा आणि महिमा चौधरीचं लूक दाखविलं गेलं होतं. याशिवाय ते चित्रपटामध्ये कुठले पात्र करत आहे, याबद्दल देखील खुलासा करण्यात आला होता. या मोशन पोस्टरमध्ये पन्नास वर्षांच्या पुरुषाच्या दुसऱ्या लग्नाचा उल्लेख केला गेला होता. दरम्यान पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं होतं, 'वधू सापडली आहे, आता तयार व्हा कारण लग्नाची मिरवणूक लवकरच निघणार आहे... जवळच्या किंवा दूरच्या थिएटरमधून.' दरम्यान या चित्रपटामध्ये महिमा चौधरी आणि संजय मिश्रा व्यतिरिक्त व्योम आणि पलक लालवानी देखील असणार आहेत.
हेही वाचा :

