ETV Bharat / entertainment

रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर' 'या' केंद्रशासित प्रदेशात करमुक्त...

रणवीर सिंग अभिनीत 'धुरंधर' हा चित्रपट आता एका केंद्रशासित प्रदेशात करमुक्त करण्यात आला आहे.

Dhurandhar Movie
'धुरंधर' चित्रपट (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 2, 2026 at 3:33 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : 'धुरंधर' दिवसेंदिवस बॉक्स ऑफिस कमाईचे नवे रेकॉर्ड तयार करत आहे. 'धुरंधर'ला फक्त देशातच नाही तर परदेशातही पसंती मिळत आहे. गेल्या 28 दिवसांपासून 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. आता हा चित्रपट केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये करमुक्त करण्यात आल्याची बातमी आली आहे. लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी एका पोस्टमध्ये 'धुरंधर' चित्रपटाला लडाखमध्ये करमुक्त दर्जा देण्याची घोषणा केली आहे. बॉक्स ऑफिसवर दुहेरी अंकी कमाई करत असताना 'धुरंधर' लडाखमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.

'धुरंधर' चित्रपट करमुक्त झाला : लडाखचे उप-राज्यपाल कविंदर गुप्ता यांच्या हँडलर लिहण्यात आलं , 'उप-राज्यपाल श्री कविंदर गुप्ता यांनी घोषणा केली आहे की, बॉलिवूड चित्रपट 'धुरंधर' केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये करमुक्त असेल. चित्रपटाचे अनेक दृश्य लडाखच्या सुंदर ठिकाणी चित्रित करण्यात आले आहेत. चित्रपटानं स्वतः लडाखचे सौंदर्य सुंदरपणे दाखवले आहे. हे चित्रपट निर्मात्यांना मजबूत पाठिंबा दर्शवते आणि केंद्रशासित प्रदेशाच्या पसंतीच्या संस्था म्हणून उदयास येण्याच्या प्रयत्नांना बळकटी देते.' लडाख हा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश आहे, जिथे 'धुरंधर' करमुक्त करण्यात आला आहे. याशिवाय हा चित्रपट अजूनही देशभरात मोठी कमाई करत आहे.

'धुरंधर'ची बॉक्स ऑफिस कमाई : 'धुरंधर' चित्रपट 3 जानेवारी रोजी प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण करेल. एक महिना पूर्ण होण्यापूर्वीच, 'धुरंधर'नं जगभरात 1100 कोटी आणि भारतात 784 कोटींची कमाई केली आहे. 'धुरंधर'ची सुरुवात प्रभावी नव्हती, मात्र रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या अभिनयामुळं या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार बनवलं. 'धुरंधर' आता बॉलिवूडचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे, जो आमिर खानचा 'दंगल' आणि शाहरुख खान स्टारर 'जवान'ला टक्कर देत आहे. या चित्रपटानं 'जवान'चा विक्रम जवळजवळ मोडला आहे आणि 'धुरंधर' लवकरच बॉलिवूडचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनणार आहे.

हेही वाचा :

  1. रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर'ची झाली बल्ले बल्ले, मोडला 'या' चित्रपटांचा विक्रम...
  2. 'धुरंधर'नं शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपटाला टाकले मागे, आता 'पुष्पा 2'वर नजर...
  3. 'धुरंधर'च्या यशादरम्यान 'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांनी चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याची केली घोषणा, 'या' देशाच्या प्रेक्षकांना मिळेल मनोरंजनाचा डोस