धर्मेंद्र आणि अगस्त्य नंदा स्टारर 'इक्कीस'नं रिलीजच्या पहिल्या दिवसी केली बॉक्स ऑफिसवर 'इतक्या' रुपयांची कमाई
धर्मेंद्र आणि अगस्त्य नंदा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'इक्कीस'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केलं याबद्दल जाणून घ्या.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 2, 2026 at 10:45 AM IST
मुंबई - अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचा 'इक्कीस' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज झाला आहे. या चित्रपटामुळं सध्या अभिनेता हा खूप चर्चेत आहे. आता सर्वांच्या नजरा या चित्रपटावर आहेत. दरम्यान हा चित्रपट दिवंगत ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचा शेवटचा आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी एक अंकी आकड्यामध्ये कमाई केली आहे. आता हा चित्रपट येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. सध्या बच्चन कुटुंबाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाच्या माध्यामातून अगस्त्य हा पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला आहे. आता या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या मते 'इक्कीस' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 7 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट येणाऱ्या दिवसांमध्ये चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. 'इक्कीस' चित्रपटामध्ये अगस्त्य नंदानं मरणोत्तर भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार, परमवीर चक्र प्राप्त करणारे अरुण खेत्रपाल यांची भूमिका केली आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित चित्रपटात 1971ची लढाई दाखविण्यात आली आहे. त्यावेळी अरुण खेत्रपाल हे हुतात्मा झाले, त्यांनी आपली शौर्यचा कहाणी सुवर्ण अक्षरामध्ये कोरली. 21 वर्षीय अरुण खेत्रपाल यांनी भारत-पाकिस्तान युद्धात शत्रूच्या अनेक टँक नष्ट केल्या.
'इक्कीस' चित्रपटाबद्दल : हा चित्रपट दिवंगत ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट आहे. तसेच आता हा चित्रपट ज्येष्ठ अभिनेत्यांच्या चाहत्यांसाठी पाहणे हे भावनिक ठरू शकतो. या चित्रपटामध्ये अगत्स्य नंदाबरोबर अक्षय कुमारची भाची सिमर भाटियानं देखील मुख्य भूमिकेत काम केलं आहे. या चित्रपटाद्वारे तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. चित्रपटामध्ये जयदीप अहलावत, सिकंदर खेर, श्री बिश्नोई आणि एकावली खन्ना यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. तसेच 'इक्कीस' या चित्रपटाची स्पर्धा ही कार्तिक आर्यन स्टारर 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' आणि रणवीर सिंगच्या 'धुरंधर' या चित्रपटांशी आहे. आता अगस्त्य नंदा अभिनीत 'इक्कीस' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर किती कमाई करेल हे काही दिवसात समजेल.
हेही वाचा :
- अगस्त्य नंदा स्टारर 'इक्कीस' चित्रपट पाहून हुतात्मा अरुण खेत्रपाल यांचे भाऊ झाले भावूक, व्हिडिओ व्हायरल...
- 'इक्कीस' स्क्रिनिंगमध्ये रेखा यांनी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदावर केला प्रेमाचा वर्षाव...
- 'इक्कीस'मधील धर्मेंद्रचा सुंदर सीन प्रदर्शित, अभिनेत्याच्या कवितेनं जिंकली पुन्हा एकदा चाहत्यांची मनं...

