ETV Bharat / entertainment

क्रिती सेनॉन आणि धनुष अभिनीत 'तेरे इश्क में' होईल 'या' दिवशी ओटीटीवर रिलीज...

क्रिती सेनॉन आणि धनुष यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'तेरे इश्क में' हा आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

Tere ishk mein movie
'तेरे इश्क में' चित्रपट (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 5, 2026 at 11:05 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि धनुष स्टारर 'तेरे इश्क में' चित्रपट हा प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. आता 'तेरे इश्क में' चित्रपट पाहायला नसणार तर, तुम्ही घरी बसून याचा आनंद घेऊ शकता. हा चित्रपट 23 जानेवारी रोजी 2026 नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित 'तेरे इश्क में' हा चित्रपट थिएटरमध्ये 28 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रिलीजच्या दोन महिन्यानंतर ओटीटीवर रिलीज होत असल्यानं धनुषचे चाहते खूप खुश झाले आहेत.

'तेरे इश्क में' चित्रपट ओटीटीवर होणार लवकरच रिलीज : दरम्यान या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर सॅकनिलकच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं भारतात 116.71कोटींची कमाई केली होती. यानंतर जगभरात या चित्रपटानं 161.96 कोटींचं कलेक्शन केलं होतं. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा क्रिती सेनॉन आणि धनुष हे एकत्र दिसले होते. 'तेरे इश्क में' चित्रपटामधील या दोघांची केमिस्ट्री अनेकांना खूप आवडली होती. या दोघांनी आपल्या अभिनयाची छाप ही प्रेक्षकांच्या मनावर सोडली होती. तसेच 'तेरे इश्क में' या चित्रपटामधील गाणी देखील खूप हिट झाली आहेत.

'तेरे इश्क में' चित्रपटाची कहाणी : या चित्रपटामध्ये धनुष फ्लाइट लेफ्टनंट शंकर गुरुक्कलची भूमिकेत आहे. तर क्रिती ही मुक्ती नैनीवालच्या भूमिकेत आहे. शंकर हा एक उत्साही विद्यार्थी नेता असून तो मुक्ती (मानसशास्त्राची विद्यार्थिनी)च्या भोवती फिरत असतो. यानंतर मुक्ती ही शंकरकडून कॉलेजमधील अनेक काम करून घेत असते. शंकर मुक्तीच्या प्रेमात पडतो. मुक्तीला जेव्हा ही गोष्ट माहित होते, तेव्हा ती याचा फायदा घेते. चित्रपटामध्ये यानंतर भावनिक ड्रामा निर्माण होतो. यानंतर शंकर हा भारतीय हवाई दलात सामील होतो. यानंतर त्याचा भूतकाळ त्याच्यासमोर येतो. या चित्रपटामध्ये धनुष आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त मोहम्मद झीशान अय्युब, प्रकाश राज, शिवराज वढावकर, परमवीर चीमा आणि इतर अनेक कलाकार आहेत.

हेही वाचा :

  1. नातं तुटल्यानंतरही धनुषनं रजनीकांत यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट व्हायरल...
  2. धनुष आणि क्रिती सेनॉन स्टारर 'तेरे इश्क में'नं केली बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई...
  3. 'तेरे इश्क में'चं ट्रेलर रिलीज, चित्रपटातील ७ संवाद तुम्हाला करणार घायाळ...