तापसी पन्नू अभिनीत 'गांधारी'साठी छाया कदमनं शिकली बंगाली भाषा...
छाया कदमनं खुलासा केला की तिनं 'गांधारी'साठी बंगाली भाषा शिकली. तसेच या चित्रपटाबद्दल तिनं विशेष माहिती दिली.

By ETV Bharat Entertainment Team
Published : August 26, 2026 at 3:40 PM IST
हैदराबाद : अभिनेत्री तापसी पन्नू 'गांधारी' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका मराठी अभिनेत्री छाया कदम देखील साकारणार आहे. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल काही विशेष गोष्टी छाया कदम यांनी सांगितल्या आहेत. 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीनं म्हटलं, "या पात्रासाठी मला बंगाली भाषा शिकण्याची संधी मिळाली आणि या अनुभवाचा मी मनसोक्त आनंद घेतला. यामुळं पात्राला एक नवी खोली मिळाली आणि हा प्रवास माझ्यासाठी अधिकच अविस्मरणीय ठरला."
छाया कदम दिसणार अनोख्या अंदाजात : 'गंगूबाई काठियावाडी','झुंड' आणि 'लापता लेडीज' यांसारख्या चित्रपटांमधील उल्लेखनीय अभिनयानंतर, छाया 'गांधारी'द्वारे प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मन जिंकण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या तापसीनं सांगितलं की, ही भूमिका तिच्यासाठी शारीरिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरली, तरीही, त्या पात्राच्या जिद्दीनं तिला सतत प्रेरित केलं. 'गांधारी'मधील आपल्या प्रवासाविषयी बोलताना तापसीनं म्हटलं की, "गांधारी'च्या संपूर्ण प्रवासात माझ्या मनात जी गोष्ट ठळकपणे राहिली, ती म्हणजे 'बानी'ची हार न मानण्याची वृत्ती, अगदी तेव्हाही जेव्हा परिस्थिती तिच्या पूर्णपणे विरोधात होती. या भूमिकेसाठी शारीरिकदृष्ट्या खूप मेहनत घ्यावी लागली, पण तिची जिद्द, दृढनिश्चय आणि अढळ मनोबल या गोष्टींनी मला खऱ्या अर्थानं आकर्षित केलं."
'गांधारी' चित्रपटाबद्दल : "कनिका आणि नेटफ्लिक्सबरोबर पुन्हा काम करणे खूपच खास होतं, गेल्या काही वर्षांत आम्ही विश्वासावर आणि गुंतागुंतीच्या, प्रभावी स्त्रियांच्या कथा सांगण्याच्या सामायिक आवडीवर आधारित एक सर्जनशील भागीदारी निर्माण केली आहे. देवाशिष आणि इतक्या प्रतिभावान कलाकारांच्या टीमबरोबर हा चित्रपट साकारण्याचा अनुभव अधिकच समाधानकारक ठरला. 3 सप्टेंबर रोजी जगभरातील प्रेक्षक 'गांधारी'चा अनुभव घेतील, याची मी आतुरतेनं वाट पाहत आहे." तापसी आणि छाया यांच्या व्यतिरिक्त, चित्रपटामध्ये मुख्य कलाकारांमध्ये इश्वक सिंग, जतिन सरना, स्वस्तिका मुखर्जी आणि मीता वशिष्ठ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. देवाशिष मखिजा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'गांधारी' या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती कनिका ढिल्लन यांनी केलं आहे. 'गांधारी'चा प्रीमियर या वर्षी 3 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

