1997मध्ये रिलीज झालेल्या 'बॉर्डर'मधील स्टार्स दिसणार 'बॉर्डर 2' चित्रपटात, वाचा अपडेट...
'बॉर्डर 2' या चित्रपटामध्ये 1997मध्ये रिलीज झालेल्या 'बॉर्डर'मधील काही स्टार्स दिसणार आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : December 23, 2025 at 5:19 PM IST
मुंबई : 2026 येण्यापूर्वीच 'बॉर्डर 2'नं रिलीजपूर्वी प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्साह निर्माण केला आहे. या चित्रपटाच्या टीझरनं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटाच्या टीझरमधील अभिनेता सनी देओलचा आवाज हा पाकिस्ताना हादरवून टाकणार आहे. दरम्यान 1997 रोजी प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटानं खूप जास्त लोकप्रियता मिळवली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटामधील गाणी देखील खूप गाजली होती. आता 'बॉर्डर 2' या नवीन चित्रपटाबद्दल एक अपडेट समोर आली आहे.
'बॉर्डर 2'मध्ये 'बॉर्डर'मधील कलाकार येईल परत : मीडिया रिपोर्टनुसार 'बॉर्डर 2' चित्रपटामध्ये अनुराग कश्यप आणि निर्माते-लेखिका निधी दत्ता 1997मधील काही पात्रांना चित्रपटात स्पेशल अपीयरेंसमध्ये परत आणत आहे. आता सुनील शेट्टी आणि त्याचा मुलगा अहानला एकत्र पाहणे पडद्यावर ही प्रेक्षकांसाठी मेजवाणीप्रमाणे असणार आहे. याशिवाय या चित्रपटासाठी अक्षय खन्ना आणि सुदेश बेरी यांनी नोव्हेंबरमध्ये मुंबईत त्यांचे काही भाग शूट केल्याचेही सांगितलं जात आहे. सध्या सुनील शेट्टी आपल्या दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये तिन्ही स्टार्सला त्याच्या जुन्या लूकमध्ये दाखवलं जाणार आहे. म्हणजेच चित्रपटामध्ये ते तरुण दाखविले जाणार आहे. या स्टार्सला जुन्या लूकमध्ये दाखविण्यासाठी स्पेशल इफेक्ट्स वापर करण्यात येणार आहे.
'बॉर्डर 2' चित्रपटाबद्दल : 'बॉर्डर 2' या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे स्टार्स असणार आहेत. याशिवाय चित्रपटामध्ये सोनम बाजवा, मोना सिंग, मेधा राणा आणि अन्या सिंग यांच्याही विशेष भूमिका असणार आहेत. दरम्यान जे. पी. दत्ता यांच्या 1997च्या 'बॉर्डर'बद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटामध्ये सनी देओल, अक्षय खन्ना,कुलभूषण खरबंदा, सुदेश बेरी, पुनीत इस्सर आणि जॅकी श्रॉफ हे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसले होते. तसेच 'बॉर्डर 2' हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :

