ETV Bharat / entertainment

सनी देओल स्टारर 'बॉर्डर 2'मधील 'घर कब आओगे' गाण्याचा व्हिडिओ पाहून चाहते झाले भावूक...

'बॉर्डर 2' चित्रपटामधील 'घर कब आओगे' गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आता या गाण्याला अनेकजण पसंत करत आहेत.

Ghar Kab Aaoge song
'घर कब आओगे' गाणं (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 3, 2026 at 10:51 AM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

जैसलमेर : 'बॉर्डर 2' चित्रपटातील बहुप्रतीक्षित देशभक्तीपर गाणे 'घर कब आओगे' भव्य व्हिडिओ शुक्रवारी भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असलेल्या तनोट माता मंदिर संकुलात लॉन्च करण्यात आलं. या ऐतिहासिक प्रसंगी, संपूर्ण सीमावर्ती भाग देशभक्तीच्या भावनेनं भारून गेला होता आणि "भारत माता की जय"च्या जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं. उपस्थितांना संबोधित करताना अभिनेता सनी देओलनं त्याचे वडील धर्मेंद्र यांची आठवण काढली. त्यांनी म्हटलं, जेव्हा तो अभिनेता झाला, तेव्हा त्यानं त्याच्या वडिलांसारखे देशभक्तीपर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता. सनी देओल भावनिकपणे व्यक्त केले की, त्यानं कधीच कल्पना केली नव्हती की त्याचे चित्रपट तरुणांना सैन्यात भरती होण्यास प्रेरित करतील. तो यावेळी जास्त बोलू शकत नाही असंही त्यानं यादरम्यान म्हटलं.

धर्मेंद्र यांच्या आठवणीनं भावनिक : 'बॉर्डर 2' या गाण्याच्या लॉन्च दरम्यान 'बॉर्डर' स्टार सनी देओलनं बीएसएफ सैनिकांना संबोधित केलं. यानंतर तो भावनिक झाला. त्यानं बीएसएफ सैनिकांना सांगितलं की, तो देखील त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्याचे वडील धर्मेंद्र यांना आठवत असताना, त्यानं जेपी दत्ता यांच्या चित्रपटात कसे काम केले होते आणि चित्रपटानंतर किती तरुण भारतीय सैन्यात भरती झाले होते ते सांगितले. या कार्यक्रमात सनी देओल म्हणाला, "मी बॉर्डर चित्रपट केला, कारण जेव्हा मी माझ्या वडिलांचा 'हकीकत' चित्रपट पाहिला तेव्हा मला तो खूप आवडला. तेव्हा मी खूप लहान होतो. जेव्हा मी अभिनेता झालो, तेव्हा मी ठरवले की मी माझ्या वडिलांसारखा चित्रपट करेन. मी जेपी दत्ता यांच्याशी बोललो आणि आम्ही दोघांनीही ठरवले की आपण या विषयावर एक चित्रपट बनवू, जो खूप प्रिय आहे आणि तुमच्या सर्वांच्या हृदयात खोलवर रुजलेला आहे."

वरुण धवन यांनी व्यक्त केल्या भावना : 1971च्या युद्धाचा संदर्भ देत अभिनेता वरुण धवन म्हटलं की, "भारत हा शांतता आणि शांततेवर विश्वास ठेवणारा देश आहे, परंतु 'बॉर्डर' सारखे चित्रपट बनवणे खूप महत्वाचे आहे. असे चित्रपट देशातील तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात आणि हा संदेश देतात की, भारत प्रत्येक आव्हानाला उत्तर देण्यास सक्षम आहे." तनोट माता मंदिरासमोरील सभागृहात आतषबाजी करून या गाण्याचे अधिकृत अनावरण करण्यात आले. यावेळी बीएसएफ सैनिकांनी सनी देओलला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. मार्चपासनंतर सैनिकांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला, ज्यामुळे वातावरणात एक वेगळा आनंद निर्माण झाला. बीएसएफ सैनिकांनी स्टेजवर सोनू निगमचाही सन्मान केला.

'बॉर्डर 2' (ETV Bharat)

निधी दत्तानं 'ही' महत्त्वाची गोष्ट सांगितली : कार्यक्रमाच्या शेवटी, निधी दत्तानं गाण्याच्या निर्मितीची भावनिक कहाणी सांगितली. तिनं स्पष्ट केलं की "19971च्या लोंगेवाला युद्धाशी संबंधित ही कहाणी वर्षानुवर्षे तिच्या कुटुंबाशी जोडली गेली आहे. युद्धादरम्यान, तिची आजी रेडिओजवळ बसून बातम्या ऐकत असे आणि नेहमी म्हणायचे, "माझा मुलगा घरी येईल." ही भावना नंतर या अमर गाण्याची प्रेरणा बनली."

कार्यक्रमात स्टार कास्ट पोहोचली : या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता सनी देओल, वरुण धवन आणि अहान शेट्टी बीएसएफ जीपमधून कार्यक्रमस्थळी पोहोचले. तसेच यावेळी गायक सोनू निगम, निर्माता भूषण कुमार आणि चित्रपट निर्माते जेपी दत्ता यांची मुलगी निधी दत्ता देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात "भारत माता की जय" या जयघोषानं झाली, ज्यामुळं सैनिक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.

चित्रपटाबद्दल : गाण्याच्या लॉन्चपूर्वी स्थानिक लोक कलाकारांनी राजस्थानच्या समृद्ध लोक संस्कृतीचे मनमोहक सादरीकरण केलं. 'केसरिया बालम आओ नी पधारो म्हारे देश' या आकर्षक सादरीकरणासह विविध लोकगीतांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर 'घर कब आओगे' गाण्याचा व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. देशभक्ती आणि उत्कटतेनं भरलेल्या या गाण्यानं अनेक बीएसएफ सैनिकांना अश्रू अनावर झाले. तसेच 'घर कब आओगे' या गाण्याला यूट्यूबवर 10 मिलियन लोकांनी पसंत केलं आहे. हे गाणं रिलीज होऊन फक्त काही तास झाले आहेत, 'बॉर्डर 2'मधील हे गाणं खूप गाजणार असं सध्याचं चित्रपट दिसत आहे. दरम्यान 'बॉर्डर 2' हा चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 1997च्या 'बॉर्डर'चा सीक्वेल आहे. 'बॉर्डर 2' चित्रपट 1971च्या भारत-पाक युद्धादरम्यान झालेल्या लोंगेवालाच्या लढाईवर आधारित होता.

हेही वाचा :

  1. 1997मध्ये रिलीज झालेल्या 'बॉर्डर'मधील स्टार्स दिसणार 'बॉर्डर 2' चित्रपटात, वाचा अपडेट...
  2. सनी देओल अभिनीत 'बॉर्डर २'चं टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ...
  3. 'बॉर्डर २'च्या निर्मात्यांनी पोस्टर शेअर करून टीझर कधी रिलीज होईल याबद्दल केलं उघड, वाचा सविस्तर....