'बॉर्डर 2' चित्रपटातील 'इश्क दा चेहरा' गाणं प्रदर्शित, पाहा व्हिडिओ
'बॉर्डर 2' या चित्रपटामधील 'इश्क दा चेहरा' गाणं रिलीज केल्या गेलं आहे. या गाण्याला अनेकजण पसंत करत आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 9, 2026 at 4:00 PM IST
मुंबई : आगामी हिंदी चित्रपट 'बॉर्डर 2' गेल्या काही काळापासून चर्चेत आहे, त्यातील आणखी एक गाणं 'इश्क दा चेहरा' आज विविध आणि अधिकृत प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे, ज्यामध्ये पंजाबी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार आहेत, दिलजीत दोसांझ, सोनम बाजवा, वरुण धवन आणि मेधा राणा हे गाण्याच्या केंद्रस्थानी आहे. याशिवाय या गाण्यामध्ये सनी देओल, अहान शेट्टी, मोना सिंग, अन्या सिंग यांचीही झलक दाखविण्यात आल्या आहेत. या गाण्यामधील त्यांची केमिस्ट्री खूप विशेष दिसत आहे. या चित्रपटामधील हे गाणं खूप भावनिक आहे. हे गाणं टी- सीरीज यांनी निर्मित केलं असून याला संगीत प्रसिद्ध गायक जोडी सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांनी दिलं आहे. हे गाणं मनाला स्पर्श करणारे आहे. या गाण्यामधील बोल कौसर मुनीर यांनी लिहिले आहेत, तर गाण्याला दिलजीत दोसांझ, सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांनी गायलं आहे.
'बॉर्डर 2' चित्रपटाबद्दल : हे गाणं सनी देओल- मोना सिंग, वरुण धवन - मेधा राणा, दिलजीत दोसांझ - सोनम बाजवा आणि अहान शेट्टी आणि अन्या सिंग यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. यामध्ये प्रत्येक जोडप्याची एक वेगळी कहाणी दाखविण्यात आली आहे. 'बॉर्डर 2'ची निर्मिती टी-सीरीज आणि जे.पी. फिल्म्स यांनी केली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 23 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केलं आहे. सध्या या चित्रपटामधील अनेक स्टार्स चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. यापूर्वी या चित्रपटामधील 'घर कब आओगे' हे गाणं रिलीज केल्या गेलं होतं. हे गाणं देखील अनेकांना आवडलं. या गाण्याला सोनू निगम, रूप कुमार राठोड, अरिजित सिंग, विशाल मिश्रा आणि दिलजीत दोसांझ यांनी गायलं आहे.
'बॉर्डर 2' चित्रपटाबद्दल : 'बॉर्डर 2' हा 1997मध्ये प्रदर्शित झालेल्या जेपी दत्ताच्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'बॉर्डर'चा सीक्वेल आहे. 'बॉर्डर' खूप हिट झाला होता. आता या गाण्याचं रीमेक देखील खूप हिट होत आहे. 'बॉर्डर 2'बद्दल देखील अनेकजण आतुर आहेत. हा चित्रपट हिट होईल हे अनेकजण रिलीजपूर्वी चित्रपटामधील गाणी ऐकून म्हणत आहेत. 'बॉर्डर 2' चित्रपट 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.
हेही वाचा :

