एका छोट्या गावातून आलेला दिलजीत दोसांझ जागतिक स्टार, वाढदिवसानिमित्त 5 हिट गाण्याची यादी पाहा...
पंजाबी गायक दिलजीत दोसांझ 6 जानेवारी रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. आता आम्ही या विशेष दिवशी त्याच्या काही गाण्याबद्दल सांगणार आहोत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 6, 2026 at 5:10 PM IST
मुंबई : ग्लोबल आयकॉन दिलजीत दोसांझ आज 6 जानेवारी रोजी त्यांचा 42 वाढदिवस साजरा करत आहे. त्यानं त्याच्या सुंदर आवाजानं जगात धुमाकूळ घातला आहे. पंजाबचा अभिमान असलेल्या दिलजीतला अनेक लोक पसंत करतात. त्याचे गाणी देखील खूप गाजली आहेत. आज तो पंजाबमधील टॉपचा गायक आणि अभिनेता आहे. याशिवाय त्याचे चित्रपट देखील प्रेक्षकांना खूप जबरदस्त वाटतात. सध्या गायकची स्टेजवर उपस्थिती ही प्रेक्षकांना घायाळ करून टाकणारी आहे. त्याच्या कुठल्याही शोचे तिकिटे मिळवणं देखील प्रेक्षकांना खूप कठिण जाते. त्याचे शो खूप हाऊसफुल असतात. दिलजीत दोसांझ सध्या संगीत जगतावर राज्य करत आहे. आता आम्ही गायकाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या काही हिट गाण्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
बॉर्न टू शाइन (2020) : 'बॉर्न टू शाइन' हे पंजाबी गाणं गायक दिलजीत दोसांझचं खूप गाजलं आहे. या गाण्यामुळं त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. हे गाणं 'जी.ओ.ए.टी.' या अल्बममधील सर्वात आश्चर्यकारक गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याला आतापर्यंत 485 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
डू यू नो (2016) : 'डू यू नो' या जागतिक हिट गाण्यात दिलजीत दोसांझ त्याच्या गर्लफ्रेंडला विचारतो की, तिला त्याच्या भावना समजतात का? लॉस एंजेलिसमध्ये चित्रित झालेल्या या म्युझिक व्हिडिओला आतापर्यंत 296 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं आताही खूप लोक ऐकतात आणि वाजवतात.
लॅम्बोर्गिनी (2016) : दिलजीत दोसांझनं त्याच्या 'लॅम्बोर्गिनी' या गाण्यात आधुनिक जीवनशैलीला पारंपारिक टच दिला आहे. या गाण्यातील सूर खूप मधूर असून यालाही अनेकांनी पसंत केलं, कारण हे गाणं गाण्यासाठी देखील खूप सोपे आहे. दिलजीतच्या या गाण्यातील लूकही खूप जोरदार आहे. या गाण्याला आतापर्यंत 416 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
लव्हर (2021) : गायक दिलजीत दोसांझनं या 'लव्हर' गाण्यानं पंजाबी संगीतात एक नवीन लाट आणली आहे. या गाण्याची लय तुम्हाला लगेच नाचायला भाग पाडणार. हे गाणं खूप हिट झालं आहे. या गाण्यानंतर दिलजीतला खूप प्रसिद्धी मिळाली. 'लव्हर' गाण्याला आतापर्यंत 191 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
5 तारा (2015) : प्रेम, प्रसिद्धी याबद्दल गाणं ऐकायचं असेल तर दिलजीतचं '5 तारा' गाणेही, खूप प्रसिद्ध आहे. या गाण्यामध्ये एका तुटलेल्या मनाच्या व्यक्तीच्या भावनांचे वर्णन केल्या गेल्या आहेत. हा मुलगा ब्रेकअपमधून पुढे जाण्याची कहाणी 5 तारा हॉटेलमध्ये जाऊन सांगतो. दुःख विसरण्याचा तो प्रयत्न करतो. या गाण्यामध्ये गायकाचा आकर्षक लूक आणि डान्स दाखविण्यात आला आहे. याशिवाय हे ट्रॅक प्रामुख्यानं पंजाबी लग्न आणि पार्ट्यांमध्ये वाजवले जाते.
हेही वाचा :

