ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार स्टारर 'भूत बंगला'मधील 'राम जी भला करेंगे' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ...

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मधील 'राम जी भला करेंगे' हे पहिले गाणं प्रदर्शित झालंय. रिलीज झाल्यानंतर, या गाण्यानं प्रेक्षकांना 'भूल भुलैया'ची आठवणी करून दिली आहे.

first song ramji bhala karenge out
पहिले गाणे 'राम जी भला करेंगे' आऊट (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : February 26, 2026 at 5:29 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : हिंदी चित्रपटसृष्टीतील अक्षय कुमार अभिनीत 'भूत बंगला' चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी 14 वर्षांनंतर एकत्र काम करत आहे. यापूर्वी या जोडीचे जितकेही चित्रपट आले आहेत, ते प्रेक्षकांना खूप पसंत पडले आहेत. आज, गुरुवारी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी 'भूत बंगला' या चित्रपटातील पहिले गाणे 'राम जी भला करेंगे' हे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यानं प्रेक्षकांना 'भूल भुलैय्या'ची आठवण करून दिली आहे. या गाण्यामुळं चाहत्यांमध्ये आता उत्साह निर्माण झाला आहे. बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित चित्रपटात प्रेक्षकांना आयकॉनिक कॉमेडी पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांमध्ये आधीच या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या उत्साहात भर घालण्यासाठी, निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले गाणे 'राम जी आके भला करेंगे' प्रदर्शित करून प्रेक्षकांना मेजवाणी दिली आहे. या गाण्यामध्ये अक्षय कुमारची उत्कृष्ट मनोरंजनात्मक शैली दाखविण्यात आली आहे.

कॉमिक एनर्जीनं भरलेले एक उत्साही ट्रॅक : हा एक उत्साही ट्रॅक असून यात वेडेपणा, जुन्या आठवणी आणि कॉमिक एनर्जी असल्यानं प्रेक्षकांना हे गाणं धमाकेदार वाटत आहे. सध्या या गाण्याचे सोशल मीडियावर प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. 'राम जी भला करेंगे' या गाण्यात अक्षय कुमार त्याच्या क्लासिक अवतारात आहे. गाण्यात अभिनेता भूताच्या जगात सहजपणे वावरत आहे. प्रीतम यांनी गाण्याला संगीतबद्ध केलं असून कुमार यांनी लिहिलेले आहे. हे गाणं अरमान मलिक आणि देव अरिजीत यांनी गायले आहे, तर मेलो डी यांनी लिहिलेला आणि सादर केलेला रॅप या गाण्याला आणखी दमदार बनवत आहे.

चित्रपट कधी होईल प्रदर्शित : बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचा भाग असलेल्या बालाजी मोशन पिक्चर्सनं केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहकार्यानं 'भूत बंगला' सादर केला आहे, यामध्ये मुख्य भूमिकेत अक्षय कुमार आहे. याशिवाय चित्रपटामध्ये वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव यांनीही विशेष भूमिका केल्या आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर. कपूर यांनी केली आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा :

  1. अक्षय कुमार स्टारर 'भूत बंगला' चित्रपटाचं शूटिंग समाप्त, अभिनेत्यानं शेअर केला व्हिडिओ...
  2. 'भूत बांगला'च्या सेटवरुन अक्षय कुमारची परेश रावलबरोबर पतंगबाजी, पाहा व्हिडिओ
  3. अक्षय कुमार स्टारर 'भूत बंगला' चित्रपटाचे शूटिंग सुरू, तब्बूनं सेटवरील फोटो केले शेअर