विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नापूर्वी सेटवर प्रेमात पडल्यानंतर 'या' स्टार्सनं केलं लग्न, पाहा यादी
चित्रपटसृष्टीतील स्टार्स त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर प्रेमात पडले आणि बराच काळ डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न केलं.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 26, 2026 at 11:45 AM IST
हैदराबाद : अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आज, 26 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. विजय आणि रश्मिका राजस्थानातील उदयपूर येथील एका रॉयल हॉटेलमध्ये लग्न करणार आहे. या लग्नात फक्त जवळचे मित्र उपस्थित राहतील. विजय आणि रश्मिका यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. या काळात ते प्रेमात पडले आहेत. आता जोडप्याप्रमाणेचं हिंदी चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटींनी आपल्या सह-कलाकारांशी लग्न केलंय, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन : मेगास्टार, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन, 'जंजीर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले आणि त्याच वर्षी म्हणजेच 1973मध्ये त्याचे लग्न झाले. लग्नाआधी हे जोडपे लंडनला जाणार होते, पण बिग बींच्या वडिलांनी त्यांना आधी लग्न करण्याचा आणि नंतर त्यांना हवं तिथे जाण्याचा सल्ला दिला. बिग बींनी त्यांच्या वडिलांचे ऐकले आणि लग्न केले.
अजय देवगन आणि काजोल : अजय देवगन आणि काजोल यांनी पहिल्यांदा 1995 मध्ये आलेल्या 'हलचल' या चित्रपटात एकत्र काम केले. 1998मध्ये आलेल्या 'प्यार तो होना ही था' या चित्रपटादरम्यान दोघांना खूप प्रसिद्धी मिळाली. आणि त्याच वर्षी त्यांनी लग्न केले. या जोडप्याला एक मुलगा आणि मुलगी आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा : 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट 2003मध्ये प्रदर्शित झाला. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांचा एकत्र पहिला चित्रपट होता. या चित्रपटाची शूटिंग हैदराबादमध्ये करण्यात आली, जिथे ते पहिल्यांदा भेटले होते. जेनेलियाला वाटले होते की, रितेश मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यानं तो खूप गर्विष्ठ असेल. मात्र जेव्हा अभिनेत्री त्याच्याशी बोलली, तेव्हा तिचे विचार चुकीचे ठरले. त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली. यानंतर मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. या जोडप्यानं 2012मध्ये लग्न केले आणि आता त्यांना दोन मुले आहेत.
सैफ अली खान आणि करीना कपूर : सैफ आणि करीनाची भेट 'टशन'च्या सेटवर झाली. त्यांनी 'ओमकारा', 'कुर्बान' आणि 'एजंट विनोद' यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. करिनानं 2012 मध्ये सैफशी लग्न केले. त्यांना या लग्नापासून दोन मुले आहेत.
करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू : करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूची प्रेमकहाणी त्यांच्या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या जोडप्याचा 'अलोन' चित्रपट हिट ठरला नाही. मात्र या जोडप्यानं 2016 मध्ये लग्न करून केलं. आता त्यांना एक मुलगी आहे.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदा 2013 मध्ये आलेल्या 'गोलियों की रासलीला - रामलीला' या चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि तिथून त्यांची जवळीक वाढली. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीमध्ये लग्न केले. त्यांना आता एक मुलगी आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत. 2020मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली आणि 2023 मध्ये त्यांनी लग्न केलं. आता या जोडप्याला एक मुलगी आहे आणि ते खूप आनंदी जीवन जगत आहेत.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट : रणबीर कपूर आणि आलिया भट्टबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी 2017 मध्ये 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आणि त्याच काळात त्यांना प्रेम झालं. 2022 मध्ये या जोडप्यानं लग्न केलं आणि त्याच वर्षी त्यांचा पहिला चित्रपट 'ब्रह्मास्त्र' देखील प्रदर्शित झाला. या जोडप्याला एक मुलगी आहे.
हेही वाचा :

