पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्यानंतर अरिजीत सिंगचे पहिले स्वतंत्र गाणं 'रैना', प्रेक्षकांना आले पसंत
अरिजीत सिंगचे पहिले स्वतंत्र गाणे 'रैना' हे रिलीज झाल्यानंतर त्याला खूप पसंती मिळत आहे. या गाण्याला संगीत शेखर रावजियानी यांनी दिलंय.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 28, 2026 at 4:31 PM IST
हैदराबाद : गायक अरिजीत सिंगचे पहिले स्वतंत्र गाणे आता रिलीज झाले आहे. हे गाणं खूप विशेष आहे. पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्यानंतर गायकानं स्वतंत्र संगीतावर लक्ष केंद्रित केलं आहे. ' रैना' या गाण्याचं नाव असून याला अनेकजण आता पसंत करत आहेत. या गाण्याला शेखर रावजियानी यांनी संगीतबद्ध केलंय. दरम्यान 27 फेब्रुवारी रोजी रिलीज झालेलं हे गाणं काही तासात सोशल मीडियावर हिट झालं आहे.
निवृत्तीनंतर अरिजीत सिंगचं पहिले स्वतंत्र गाणे : दरम्यान हे गाणे पार्श्वगायनातून ब्रेक घेतल्यानंतरचे त्याचे पहिले स्वतंत्र ट्रॅक आहे. 27 फेब्रुवारी रोजी रिलीज झाल्यानंतर, संपूर्ण गाणे सोशल मीडियावर हिट झाले आणि चाहते त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडले. अरिजीत सिंग आणि शेखर रावजियानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'रैनाबद्दल शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'रैना आता रिलीज झाले आहे . हे तुमच्या सर्वांचे आहे. आवाज वाढवा, ते तुमच्या मनानं अनुभवा आणि रात्रीच्या भावनेत हरवून जा. @garuudaamusiic YouTube चॅनेलवर अधिकृत व्हिडिओ पाहा. अरिजीतनं हे गाणे त्याच्या मधुर आवाजात गायले आहे.'
19 तासांत चाहत्यांचे आवडते बनले : हे गाणे एका महिलेभोवती फिरते, जी रात्रीसारखीच सुंदर आणि रहस्यमय दिसते. हे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्वांचे आवडते बनले. दरम्यान 27 जानेवारी रोजी अरिजीत सिंगनं पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली. त्यानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिलं होतं, 'इतक्या वर्षांमध्ये तुमच्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. आता, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, मी भविष्यात पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही.' तसेच अरिजीत सिंगनं कारकिर्दीचे वर्णन अद्भुत असल्याचं केलं होतं. अरिजीत सिंग सिंगच्या निवृत्तीच्या बातमीनंतर सोशल मीडियावर खूप गोंधळ उडला होता. आता गायक हा स्वतंत्र गायन करणार आहे, त्यामुळं त्याच्या चाहत्यांना त्याचा सुंदर आवाज ऐकायला मिळेल.
हेही वाचा :

