ETV Bharat / entertainment

जन्माने हिंदू असलेल्या एआर रहमान यांनी मुस्लिम धर्म का स्वीकारला ? वाचा सविस्तर...

संगीतकार आणि गायक एआर रहमान यांचा 6 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. आता या विशेष प्रसंगी त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या.

AR RAHMAN BIRTHDAY
एआर रहमान यांचा वाढदिवस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 6, 2026 at 12:07 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - संगीतकार आणि गायक ए आर रहमान हे नाव भारतीय संगीत जगात खूप प्रसिद्ध आहे. गायकानं चित्रपटसृष्टीतील अनेक गाण्यासाठी संगीत दिलं आहे. ए आर रहमान यांनी संगीतकार म्हणून स्वतःचा आब निर्माण केला आहे. संगीत दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी गायलेली गाणीही संगीतप्रेमींना वेगळ्या जगात घेऊन जातात. कामाबरोबरच, रहमान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यमुळं देखील चर्चेत राहिले आहेत. आज 6 जानेवारी रोजी एआर रहमान हे त्यांचा 59वा वाढदिवस साजरा करत आहे. हा दिवस त्यांच्या चाहत्यांसाठी खूप विशेष आहे. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. दरम्यान मुस्लिम धर्माचे असलेले ए आर रहमान एकेकाळी हिंदू होते. आज आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत, जी कमी जणांना ठाऊक असेल.

ए आर रहमान हिंदू कुटुंबातील : एआर रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला. ते हिंदू कुटुंबातील असून त्याचं मूळ नाव दिलीप कुमार होतं. त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे त्यांचं जगच बदलू गेलं. धर्मांतर करण्याचा त्यांनी महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते रहमान यांचे इस्लाम धर्मांतर हे त्यांच्या वडिलांशी जोडले जाते. एका संभाषणादरम्यान ए.आर. रहमान यांनी खुलासा केला होता की, त्यांचे वडील कर्करोगाशी झुंजत होते. त्यांचा जीवन-मरणाशी संघर्ष सुरू असताना एका सूफी संतानं त्यांच्यावर उपचार केले होते. यानंतर काही वर्षांनी, जेव्हा रहमान त्या सूफी संताला भेटले, त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबानं इस्लाम धर्म स्वीकार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दिलीप कुमार यांचं नाव अल्लाह रखा रहमान (ए.आर. रहमान) असं ठेवण्यात आले होते. त्यांनी हेही सांगितलं की, त्यांचं ए.आर. रहमान हे नाव एका हिंदू ज्योतिषानं सुचविले होते.

एआर रहमान संगीत क्षेत्रामधील योगदान : एआर रहमान यांनी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि अनेक भाषांमध्ये काम केलं आहे. रहमान यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1992मध्ये आलेल्या दिग्गज चित्रपट निर्माते मणिरत्नम यांच्या 'रोजा' चित्रपटापासून केली. या चित्रपटामधील गाणी ही खूप विशेष होती. या गाण्यातील संगीत चाकोरीबाहेरचं आणि सुरेल होतं. या चित्रपटामधील गाण्यांना खूप प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर ए आर रहमान हे सर्वांच्या नजरेत आले होते. या चित्रपटामुळं त्याचं नशीब चमकलं. रहमान यशाच्या पायऱ्या चढत गेले. त्यांना 81व्या अकादमी पुरस्कारांमध्ये, 'स्लमडॉग मिलिनेअर'मधील 'जय हो' गाण्यासाठी ऑस्कर मिळाला होता. याशिवाय त्यांनी 2010मध्ये दोन ग्रॅमी पुरस्कार देखील याच गाण्यासाठी जिंकले आहेत. रहमान हे ऑस्कर आणि ग्रॅमी जिंकणारे पहले भारतीय बनले होते.

हेही वाचा :

  1. 'मला लहानपणापासूनच रहमान सरांबरोबर काम करायचे होते,' राम चरणनं 'पेड्डी'मधील 'चिकरी चिकीरी' गाण्याबद्दल मांडले आपले विचार...
  2. एआर. रहमानच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये धनुषनं केली अचानक एन्ट्री, चाहत्यांना बसला सुखद धक्का...
  3. ए.आर. रहमान यांची प्रकृती बिघडल्यानंतर पत्नी सायरा बानूनं केलं महत्वपूर्ण विधान, वाचा सविस्तर