ETV Bharat / entertainment

'श्री रामभूमी'चं शूटिंग पूर्ण, अनुपम खेर यांनी आध्यात्मिक अनुभवावर केलं भाष्य...

अनुपम खेर यांनी 'श्री रामभूमी' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटाबद्दल त्यांनी काही विशेष गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

Anupam Kher
अनुपम खेर (Photo - IANS)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : August 29, 2026 at 1:03 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या आगामी 'श्री रामभूमी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे, या चित्रपटामध्ये त्यांनी दिवंगत विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंघल यांची भूमिका साकारली आहे. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर घोषणा करताना, अभिनेत्यानं या चित्रपटाचे वर्णन एक अत्यंत अर्थपूर्ण आणि आध्यात्मिक अनुभव असं केलंय. इन्स्टाग्रामवर, अनुपम यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. दरम्यान फोटो आणि व्हिडिओंची एक मालिका शेअर करत अनुपम यांनी लिहिलं, "माझे 'श्री रामभूमी' चित्रपटातील काम पूर्ण झाले आहे. काही चित्रपट अभिनेत्याला आपण चांगलं काम केलं आहे याचं समाधान देतात. काही चित्रपट एका महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या चित्रपट प्रकल्पाचा भाग असल्याचा अभिमान देतात. पण असे काही चित्रपट असतात जे केवळ अभिनेत्यालाच नाही, तर माणसालाही खोलवर स्पर्श करतात. ते आत्म्याला शुद्ध करतात आणि मनाला एका गहन आणि शांततापूर्ण आध्यात्मिक अनुभवानं भरून टाकतात."

अनुपम खेर यांनी शेअर केली पोस्ट : यानंतर त्यांनी पुढं लिहिलं, 'श्री रामभूमी हा माझ्यासाठी असाच एक चित्रपट आहे. श्री अशोक सिंघलजींची भूमिका साकारण्याची संधी मिळणं, ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे. रामजन्मभूमी चळवळीसाठी आणि रामलल्लाच्या भव्य मंदिराच्या दूरदृष्टीसाठी त्यांचं समर्पण, चिकाटी आणि अमूल्य योगदान शब्दातीत आहे.' यानंतर अभिनेत्यानं पुढं म्हटलं, 'मी निर्माते, दिग्दर्शक, माझे सह-कलाकार आणि चित्रपटाच्या युनिटमधील प्रत्येक सदस्याचे मनापासून आभार मानतो. माझ्या अभिनयासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. लवकरच, श्री रामभूमी तुम्हा सर्वांसमोर सादर होईल. जय श्री राम!'

राम मंदिरावर आधारित चित्रपट : दरम्यान शेअर केलेल्या फोटोत अनुपम खेर अशोक सिंघलच्या भूमिकेत दिसत आहेत, सोबतच चित्रपटाच्या टीमबरोबर पोझ देताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीवर आधारित असलेला 'श्री रामभूमी' हा चित्रपट, मंदिराच्या सभोवतालचा अनेक दशकांचा प्रवास आणि त्यासंबंधित महत्त्वाच्या घटनांचा इतिहास सांगेल. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या आगामी चित्रपटात ऋत्विक भौमिक आणि अमृता खानविलकर यांच्याही विशेष भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला 41 वर्षे पूर्ण, पत्नीसाठी केली पोस्ट शेअर
  2. भारतीय सैन्याच्या जवानाचा कथितरीत्या अपमान करणाऱ्या तरुणीच्या व्हायरल व्हिडिओवर अनुपम खेर यांनी केलं 'हे' भाष्य
  3. बोमन इराणी यांनी 'खोसला का घोसला'च्या आगामी भागाचे शूटिंग केले पूर्ण