ETV Bharat / entertainment

'कौन बनेगा करोडपती 17'मध्ये 'इक्कीस'चं प्रमोशन, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासमोर आली कठीण परिस्थिती...

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदानं रिअ‍ॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती 17'मध्ये हजेरी लावली. यादम्यान तो एका प्रश्नामुळं गोंधळात पडला.

Amitabh Bachchan And Agastya Nanda
अमिताभ बच्चन आणि अगस्त्य नंदा (IANS)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : December 24, 2025 at 5:31 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - अभिनेता अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा सध्या त्यांच्या आगामी 'इक्कीस'मुळं चर्चेत आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अगस्त्य नंदाच्या या चित्रपटात अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया, जयदीप अहलावत आणि दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनीही विशेष भूमिका केल्या आहे. दरम्यान मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या क्विझ रिअ‍ॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती 17'मध्ये अगस्त्य नंदानं भाग घेतला. अगस्त्य त्यांच्या 'इक्कीस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये हजर होता. दरम्यान 'इक्कीस' चित्रपटामध्ये अगस्त्य नंदा हा परमवीर चक्र मिळवणारे सर्वात तरुण सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपालची भूमिका साकारणार आहेत.

अगस्त्य नंदाला विचारण्याला आला कठिण प्रश्न : या शोमध्ये अगस्त्य नंदाला एक प्रश्न विचारला गेला, ज्याचं उत्तर द्याला त्याला कठीण गेलं. या शोमध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू हॉट सीटवर बसतो आणि प्रेक्षकांमधील एक व्यक्ती त्याला एक प्रश्न विचारतो. शोदरम्यान ही व्यक्ती अगस्त्याला विचारते की, "तुला जास्त तुझे आजोबा आवडते की आजी." यानंतर अगस्त्य हा गोंधळात पडतो आणि तो म्हणतो, "दुसरा प्रश्न विचारा." यावर तिथे उपस्थित असणारे प्रेक्षक हे हसतात. यावर अमिताभ बच्चन म्हणतात की, "मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे." यानंतर जयदीप अहलावतनंतर म्हणतो, "जर तुम्हाला व्हॅनिटी व्हॅनमध्ये मार खायचा असेल तर तुमच्या आजीचे नाव घ्या... आणि जर तुम्हाला घरी मार पाहिजे असेल तर तुमच्या आजोबांचे नाव घ्या."

अमिताभ बच्चन यांनी केलं अगस्त्य नंदाचं कौतुक : यानंतर यावर अगस्त्यची आई श्वेता बच्चन आणि बहीण नव्या नवेली नंदा देखील हसतात. हा प्रश्न अगस्त्यसाठी खूप कठिण असल्याचं यावेळी दिसलं. दरम्यान मंगळवारी अमिताभ बच्चन यांनी अगस्त्य नंदाच्या 'इक्कीस' चित्रपटाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये चित्रपट आणि त्यांच्या भावनांबद्दल लिहिलं होतं, 'जेव्हा मी अगस्त्यला 'इक्कीस'मध्ये पाहिलं, तेव्हा माझे मन भरून आलं, मला तो वेळ आठवला, जेव्हा त्याची आई श्वेता ही प्रसूतीदरम्यान वेदनांना तोंड देत होती आणि तिला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्याचा जन्म काही तासांनी झाला, यानंतर मी त्याला माझ्या हातात घेऊन त्याच्या डोळ्यांच्या रंगावर चर्चा केली, ते निळे आहे का ? असा विचार केला. आता मी त्याला अभिनेता होण्याच्या त्याच्या वैयक्तिक निर्णय आणि आज रात्री पडद्यावर पाहिले, प्रत्येक वेळी तो फ्रेममध्ये असताना माझ्या नजरा त्याच्या वरून जात नव्हत्या. अभिनेत्यानं आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या नातवाचं कौतुक केलं होतं.

हेही वाचा :

  1. अमिताभ बच्चन यांनी नातू अगस्त्य नंदाचं 'इक्कीस'साठी केलं कौतुक, पोस्ट व्हायरल...
  2. अमिताभ बच्चन यांनी ८३वा वाढदिवसानंतर चाहत्यांना मागितली माफी, पोस्ट शेअर करून व्यक्त केल्या भावना...
  3. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त 'जलसा'बाहेर चाहत्यांची गर्दी...