यश राज फिल्म्सचा 'अल्फा' होईल 'या' दिवशी रिलीज, जाणून घ्या तारीख
यश राज फिल्म्सचा 'अल्फा' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : May 30, 2026 at 12:39 PM IST
हैदराबाद : यश राज फिल्म्सचा 'अल्फा' हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेक वेळा बदलण्यात आली आहे. आता, यश राज फिल्म्सनं 'अल्फा'च्या प्रदर्शनाच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी बदलले आहे, ज्यामुळं आलिया भट्ट आणि शर्वरीचा ॲक्शन थ्रिलर 'अल्फा'अपेक्षेपेक्षा लवकर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकते. चित्रपटाची अधिकृत प्रदर्शनाची तारीख मूळतः जुलै,2026 अशी ठरविण्यात आली होती. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख एका आठवड्यानं पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 'अल्फा' आता 3 जुलै, 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'अल्फा' एका आठवड्यापूर्वी होणार प्रदर्शित : याशिवाय 'धमाल 4'ची 3 जुलैची प्रदर्शनाची तारीख बदलून 17 जुलै करण्यात आल्यानंतर 'अल्फा'ला त्याच्या नियोजित प्रदर्शन तारखेच्या एका आठवड्यापूर्वी रिलीज करून यश राज फिल्म आलियाच्या चाहत्यांना एक भेट देत आहे. तसेच 'धमाल 4' 17ला प्रदर्शित झाल्यानंतर 'अल्फा'ला चांगली कमाई करण्याची संधी मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, 'अल्फा'च्या चित्रपटगृहांतील प्रदर्शनासाठी 3 जुलै ही योग्य तारीख ठरेल असं सध्याचं चित्र दिसत आहे. तसेच 3 जुलै रोजी कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होत नसल्यामुळं, निर्माते आदित्य चोप्रा यांना 'अल्फा'च्या चित्रपटगृहातील प्रदर्शनासाठी ही योग्य तारीख वाटली आहे. यश राज फिल्म्सनं अद्याप नवीन प्रदर्शन तारख अधिकृतपणे उघड केली नाही.
चांगली कमाई करेल : 'अल्फा'ला आता बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांच्या कालावधी प्रदर्शित होत असल्यामुळं चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान या चित्रपटाच्या अनेकदा प्रदर्शनाची तारीख बदलविण्यात आली आहे. दरम्यान हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता, मात्र यानंतर या चित्रपटाची रिलीज तारीख एप्रिल 2026 करण्यात आली होती. यानंतर हा चित्रपट निर्मात्यांनी 10 जुलै रोजी रिलीज होईल याबद्दल माहिती प्रसारित केली होती. आता रिपोर्टनुसार हा चित्रपट 3 जुलै रोजी रिलीज होईल.

