ETV Bharat / entertainment

अक्षय कुमारच्या कारला धडक, अपघात ऑटोरिक्षा चालक झाला जखमी...

अक्षय कुमारबाबत एक धक्कादायक घटना समोर येत आहे. त्याच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

Akshay Kumar
अक्षय कुमार (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 20, 2026 at 10:51 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना आता सध्या चर्चेत आले आहेत. परदेशी दोऱ्यावरून परत येत असताना मुंबईतमध्ये एक धक्कादायक घटना घडली. विमानतळावरून जुहूला घरी जात असताना एक भरधाव वेगवान येणाऱ्या मर्सिडीज कारनं ऑटोरिक्षाला टक्कर दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती, की ती ऑटोरिक्षा अक्षयच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनावर आदळली. यानंतर अभिनेत्याच्या एसयूव्हीला धडकली. या घटनेत अक्षय आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे सुरक्षित आहेत. मात्र या घटनेत ऑटोरिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली असल्याचं समजत आहे. आता या धक्कादायक घटनेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, जे खूप गंभीर आहेत. या व्हिडिओमध्ये घटनेचे काही दृश्य दाखविण्यात आले आहेत.

अक्षय कुमारच्या कारचा अपघात : याशिवाय व्हिडिओमध्ये, जिथे ही घटना घडली, तिथे खूप गर्दी झाल्याची देखील दिसत आहे. गर्दीमध्ये लोकांनी वेढलेल्या ऑटोरिक्षाच्या आता एक व्यक्त अडकलेला दिसत आहे. यावेळी तो व्यक्ती अस्वस्थ आणि चिंतेत दिसत होता. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याचं देखील दिसत आहे. मात्र तो पूर्णपणे शुद्धीवर आहे. यावेळी तो व्यक्ती लोकांशी बोलत असून त्याला तिथून काढण्याची विनवणी करत आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचताना, प्रतिसाद देताना दिसत होती. याशिवाय अपघात झाल्याच्या ठिकाणी लोक त्या व्यक्तीला पाणी पिण्यासाठी देत असून त्याला बाहेर काढण्याचा आणि वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. रस्ते अपघातात कारचा चालक जखमी झाला असून त्याला ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. कार चालकाव्यतिरिक्त, ऑटोरिक्षामधील दोन लोक देखील अपघातात जखमी झाले आहेत.

रस्ते अपघात (ANI)

ऑटोरिक्षा चालकाच्या भावाची प्रतिक्रिया : घटनास्थळावरील व्हिडिओ आणि फोटो अपघाताची तीव्रता दर्शविते. दृश्यांमध्ये अक्षय कुमारच्या सुरक्षा ताफ्यातील एक वाहन उलटलेले दिसत आहे, तर ऑटोरिक्षा मोठ्या प्रमाणात खराब झाल्याची दिसत आहे. अपघात इतका भीषण असून परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. दरम्यान अक्षय कुमार नुकताच त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे परदेशातून मुंबईत परत येत असताना ही घटना घडली. हे दोघेही त्यांच्या 25व्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेले होते. मुंबईमध्ये दाखल झाल्याच्या काही वेळात हा अपघात झाला. दरम्यान हा गंभीर अपघात झाल्यानंतर ऑटोरिक्षा चालकाचा भाऊ मोहम्मद समीर म्हटलं, "ही घटना रात्री 8 ते 8.30च्या सुमारास घडली. माझा भाऊ रिक्षा चालवत होता, तेव्हा अक्षय कुमारची इनोव्हा आणि एक मर्सिडीज मागे होती. जेव्हा मर्सिडीजनं इनोव्हाला धडक दिली, तेव्हा इनोव्हा रिक्षावर आदळली. परिणामी, माझा भाऊ आणि दुसरा एक प्रवासी त्याखाली अडकले. संपूर्ण रिक्षा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे आणि माझ्या भावाची प्रकृती खूप गंभीर आहे. माझी फक्त एवढीच विनंती आहे की, माझ्या भावाला योग्य उपचार मिळावेत आणि रिक्षाच्या नुकसानीची भरपाई मिळावी. आम्हाला दुसरे काहीही नको आहे." तसेच याप्रकरणी पोलिसांनी स्पष्ट केलं की, संबंधित एस्कॉर्ट वाहन अक्षयच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी वापरले जाते आणि त्यावेळी प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी वाहनात उपस्थित होते. अभिनेत्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य तेथे उपस्थित नव्हता. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :

  1. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि इतर सेलिब्रिटींनी केले मतदान...
  2. अक्षय कुमार अभिनीत 'भूत बंगला'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख आली समोर, जाणून घ्या कधी दाखल होईल चित्रपट
  3. ख्रिसमसच्या दिवशी 'वेलकम टू द जंगल'बद्दल दिली अक्षय कुमारनं माहिती, संपूर्ण स्टारकास्टसह व्हिडिओ केला शेअर