अक्षय कुमार अभिनीत 'भूत बंगला'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख आली समोर, जाणून घ्या कधी दाखल होईल चित्रपट
अक्षय कुमार स्टारर 'भूत बंगला' या चित्रपटाची रिलीज तारीख बदलविण्यात आली आहे. आता हा चित्रपट एका नवीन तारखेला रिलीज होईल.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 8, 2026 at 10:20 AM IST
मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूत बंगला' हा सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल अनेकजण आतुर आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता 'भूल भुलैया'नंतर अक्षय हा त्याच्या 'भूत बंगला' चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चित्रपटाबद्दल अनेक अपडेट आल्या आहेत. आता पुन्हा एकदा या चित्रपटाबद्दल एक अपडेट आली आहे. 'खिलाडी कुमार'चा हा चित्रपट 15 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून याबद्दलची प्रेक्षकांना माहिती दिली आहे. आता अक्षयला पुन्हा एकदा जुन्या अंदाजात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
निर्मात्यांची पोस्ट व्हायरल : 'भूत बंगला'च्या निर्मात्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'बंगल्यातून बातमी! 15 मे 2026 रोजी दरवाजे उघडतील. चित्रपटगृहात भेटूया, भूत बंगला.' दरम्यान या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल सांगायचं झालं तर यात अक्षय कुमार व्यतिरिक्त तब्बू, परेश रावल, वामिका गब्बी, राजपाल यादव, जिशु सेनगुप्ता आणि असरानी हे आहेत. हा चित्रपट आधी 2 एप्रिल 2026 रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार होता. आता निर्मात्यांनी रिलीज तारीख बदलवली आहे. हा चित्रपट असरानी यांचा शेवटचा असणार आहे, कारण त्यांचे 20 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं. या चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, एकता कपूर, अक्षय कुमार यांनी बालाजी टेलिफिल्म्स आणि केप ऑफ गुड फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे.
अक्षय कुमारचं वर्कफ्रंट : या चित्रपटाची सहनिर्मिती फराह शेख आणि वेदांत बाली यांनी केली आहे. याशिवाय चित्रपटाची कहाणी आकाश ए. कौशिक यांनी लिहिली आहे. तसेच पटकथा प्रियदर्शन आणि अभिलाष नायर लिहिली आहे. आता अक्षयचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची खूप आतुरतेनं वाट पाहात आहे. या चित्रपटाच्या कास्टवरून अस वाटते की, यामध्ये प्रेक्षकांना खूप धमाल पाहायला मिळेल. दरम्यान अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तो पुढं 'हैवान' 'हेरा फेरी 3' 'राउडी राठोड 2' 'वेलकम टू द जंगल' आणि 'ओह माय गॉड 3' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :

