'भूत बंगला' चित्रपटातील पोस्टरसह नवीन रिलीज तारीख आली समोर
अक्षय कुमार स्टारर 'भूत बंगला' या चित्रपटातील पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. पोस्टरसह चित्रपटाची नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 24, 2026 at 1:43 PM IST
हैदराबाद : 'भूत बंगला' हा 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे कारण, तो हिंदी चित्रपटसृष्टीतील अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या बहुप्रतीक्षित पुनर्मिलनाचे प्रतीक आहे, जे 14 वर्षांच्या काळानंतर एकत्र काम करत आहेत. बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या जोडीच्या आयकॉनिक कॉमेडी चित्रपटांवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांमध्ये 'भूत बंगला'साठी प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. या चित्रपटाची चर्चा खूप जास्त प्रमाणात सोशल मीडियावर होत आहे, या जोडीचं मागील सहकार्य खूप विशेष राहिली आहे. त्यांनी कॉमेडी क्लासिक्स दिल्या आहेत आणि आता चाहते 'भूत बंगला' चित्रपटाद्वारे तोच जोश आणि सिग्नेचर विनोद मोठ्या पडद्यावर परतण्याची अपेक्षा करत आहेत. या उत्साहाला आणखी बळकटी देण्यासाठी, निर्मात्यांनी अक्षय कुमारचा चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे.
'भूत बंगला' चित्रपटातील पोस्टर रिलीज : 'भूत बंगला' चित्रपटातील नवीन दृश्य पूर्ण विनोदी वळणासह एक गडद भयपट सादर करतो. अक्षय कुमार पुन्हा एकदा त्याच्या जुन्या अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे. दरम्यान शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तो पांढऱ्या धोती, रुद्राक्षाची माळ आणि चश्मा लावलेला असल्याचा दिसतो. याशिवाय तो पोस्टरमध्ये सिंहासनावर बसून ओरडतो. त्याचा हा लूक कार्तिक आर्यनच्या 'रूह बाबा'शी जुळणारा आहे. हा लूक 'भूल भुलैया 2'आणि 'भूल भुलैया 3'मध्ये दिसला आहे. अक्षय हा 'भूल भुलैया'मध्ये दिसला आहे. यानंतर या चित्रपटाचे दोन सीक्वेल तयार करण्यात आले, मात्र यात तो दिसला नाही. या चित्रपटाचे तिन्ही भाग प्रेक्षकांना खूप पसंत आले होते. या तिन्ही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
चित्रपट कधी होईल रिलीज : दरम्यान बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचा एक डिवीजन, बालाजी मोशन पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहकार्यानं 'भूत बंगला' हा चित्रपट सादर करण्यात येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वामिका गब्बी, राजपाल यादव, परेश रावल, तब्बू,मिथिला पालकर आणि दिवंगत असरानी यांच्याही भूमिका असणार आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित, या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर. कपूर यांनी केली आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. आता पुन्हा एकदा अक्षय कुमार त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.
हेही वाचा :

