उर्मिला मातोंडकर स्टारर सायको थ्रिलर 'कौन'च्या 27व्या वर्धापन दिननिमित्त अभिनेत्रीनं शेअर केला ट्रेलर
उर्मिला मातोंडकर आणि मनोज बाजपेयी यांच्या प्रमुख्य भूमिका असलेला सायको थ्रिलर 'कौन'चा 27वा वर्धापन दिन असून तिनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 27, 2026 at 1:07 PM IST
हैदराबाद : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं तिच्या सुपरहिट सायको थ्रिलर 'कौन'च्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सायकोलॉजिकल थ्रिलरचा ट्रेलर शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं, 'कौन'चा मूळ ट्रेलर. 27 वर्षांपूर्वी वन रेनी नाईट...' 1999मध्ये प्रदर्शित झालेला 'कौन' हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात रोमांचक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलंय. 'कौन' चित्रपटात उर्मिला मातोंडकरबरोबर अभिनेता मनोज बाजपेयी आणि सुशांत सिंग हे स्टार्स देखील मुख्य भूमिकेत होते.
सायको थ्रिलर 'कौन'चा 27वा वर्धापन दिन : या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 'कौन' चित्रपटाची कथा देखील खूप दमदार होती. चित्रपटाच्या कहाणीबद्दल सांगायचं झालं तर 'एका वादळी रात्रीच्या काळात असतो, ज्यामध्ये एका तरुणी तिच्या घरात एकटी असते आणि एका सीरीयल किलरच्या बातम्या टेलिव्हिजन न्यूज चॅनेलवर येत असतात. जेव्हा एक अनोळखी व्यक्ती तिच्या दारावर येऊन मुसळधार पावसापासून बचावाची गरज असल्याचे सांगतो, तेव्हा तिला संशय आणि तणाव निर्माण होऊ लागते. या चित्रपटात उर्मिला मातोंडकरनं खूप धमाकेदार अभिनय केला आहे. चित्रटात अनपेक्षित ट्विस्ट प्रेक्षकांना शेवटपर्यंत अंदाज लावण्यात भाग पाडते.


उर्मिला मातोंडकरचं वर्कफ्रंट: दरम्यान या चित्रपटाद्वारे उर्मिला मातोंडकरनं स्वत:ची एक वेगळी ओळख हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केली. दरम्यान उर्मिलाच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीनं बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. तिला 'मासूम'सारख्या चित्रपटांमधून ओळख मिळवली. दरम्यान 90च्या दशकात, तिनं 'रंगीला', 'जुदाई', 'सत्या', 'प्यार तुने क्या किया', 'जानम समझा करो', 'खूबसूरत' चमत्कार' भूत' आणि इतर चित्रपटांमध्ये तिनं काम केलंय. उर्मिलानं 90च्या दशकात आपल्या सौदर्यामुळं अनेकांना मोहित करून टाकले होते. आता अभिनेत्री ही हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय नाही. ती एक राजनेता म्हणून काम करते.
हेही वाचा :

