रिंकू राजगुरूनं धमाकेदार लावणीवर नृत्य करून सर्वांना केलं मोहित...
अभिनेत्री रिंकू राजगुरूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती सुंदर नृत्य करत आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 2, 2026 at 5:17 PM IST
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या 'आशा' चित्रपटामुळं चांगली चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट अनेकांना आवडत आहे. आता रिंकू राजगुरू सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडिओमुळं चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. या व्हिडिओमध्ये रिंकूनं सुंदर नृत्य केलं असून ती खूप देखणी दिसत आहे. सध्या तिचं सोशल मीडियावर अनेकजण कौतुक करत आहेत. तिनं हे नृत्य प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटीलबरोबर केला आहे. रिंकूनं लता मंगेशकर यांच्या 'राजसा जवळी जरा बसा' या लावणीवर भन्नाट नृत्य करून सर्वांना मोहित केलं आहे.
रिंकू राजगुरूचा धमाकेदार लावणी डान्स : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिंकूनं लाल- केशरी रंगसंगतीची साडी नेसली असून तिनं डिझायनर ब्लाऊज, गळ्यात हार, नाकात नथ, पायात घुंगरू आणि मराठमोठ साजश्रृंगार केला आहे. तिचा हा लूक खूप आकर्षक आहे. दरम्यान अभिनेत्रीनं तिचा हा व्हिडिओ शेअर करत आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आपल्या पिढ्यांची वारसा असणारी लावणी. लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठलेल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे तुमच्यासोबत share करताना मला आनंद वाटत आहे. ' याशिवाय रिंकूनं आपल्या पोस्टमध्ये काही इमोजी देखील शेअर केले आहेत. दरम्यान तिनं केलेली पोस्ट सोशल मीडियावर आता चर्चा विषय बनली आहे.
रिंकू राजगुरूचं झालं कौतुक : रिंकू राजगुरूला लावणी कोरियोग्राफर आशिष पाटील यांनी शिकवली आहे. ही लावणी रिंकून 2 तास सराव करून शिकली आहे. तसेच तिच्या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'खूप छान रिंकूजी.' दुसर्या एकानं लिहिलं, 'कमीत कमी 10 वेळा पाहिली मी खूप मस्त रिंकू' आणखी एकानं लिहिलं, 'आर्ची खूप सुंदर दिसतेस, नृत्य पण छान करतेस एक नंबर .' याशिवाय अनेकजण या पोस्ट फायर इमोजी शेअर करत आहेत. दरम्यान रिंकू ही नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटामुळं खूप चर्चेत आली होती. तिचा हा चित्रपट दमदार होता. या चित्रपटानं 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर आकाश ठोसर हा मुख्य भूमिकेत दिसला होता. आता रिंकू राजगुरूचा 19 डिसेंबर रोजी 'आशा' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट महिलांच्या संघर्षांवर आधारित आहे.
हेही वाचा :

