ETV Bharat / entertainment

अभिनेत्री नीलम साईचरणी नतमस्तक, म्हणाली पुढच्यावेळी पतीसह येणार साईंच्या दर्शनासाठी..

नीलम कोठारीनं आपल्या कुटुंबाबरोबर साईबाबाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी तिचा साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

Neelam Kothari
नीलम कोठारी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : February 23, 2026 at 12:06 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी आज तब्बल 15 वर्षांनंतर आल्याचं आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्यानं नव्वदचं दशक गाजवणारी अभिनेत्री नीलम कोठारी हिने सांगितलं. माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाची शिर्डीच्या साईबाबांवर नितांत श्रद्धा आहे. 15 वर्षांपूर्वी शिर्डीला आले होते. त्यावेळी माझं नुकतंच समीर सोनी यांच्याशी लग्न झालं होतं. आम्ही दोघांनीही शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आज पुन्हा साईबाबांच्या दर्शनासाठी आले असल्याचं अभिनेत्री नीलम कोठारी हिनं 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

नीलम कोठारीनं व्यक्त केल्या भावना : अभिनेत्री नीलम कोठारी हिनं आज आपल्या परिवारासह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी नीलम कोठारीनं साईबाबांच्या द्वारकामाई आणि गुरुस्थान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन कोठारी यांचा सत्कार केला. साईबाबांच्या दर्शनानंतर नीलम कोठारी हिनं आपल्या कुटुंबीयांसह मंदिर परिसरातील संस्थानच्या देणगी कार्यालयात जाऊन देणगी दिली. यावेळी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना नीलम कोठारी म्हणाली की, पुढच्या वेळी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येताना पती समीर सोनी यांनाही सोबत घेऊन येणार आहे. माझ्यासह संपूर्ण कुटुंब साईबाबांना खूप मानतं. आज साईबाबांचं दर्शन घेऊन खूप समाधान वाटलं. साईबाबा संस्थानच्या वतीनं साई दर्शनाची अत्यंत चांगली व्यवस्था करण्यात आली होती. आज साईबाबांचे दर्शन घेऊन खूप आनंद झाल्याचेही तिनं सांगितलं. साई दर्शनावेळी असे वाटत होतं की, साईबाबा साक्षात माझ्यासमोर उभे आहेत आणि माझी सर्व स्वप्नं पूर्ण केली आहेत, असंही अभिनेत्री नीलम कोठारी हिनं नमूद केलं.

नीलम कोठारी (ETV Bharat)

नीलम कोठारीबद्दल... : नीलम कोठारी 1980 आणि 90च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय होती. तिला 'इल्जाम','खुदगर्ज' 'हत्या', 'पाप की दुनिया', 'आग ही आग' सारख्या चित्रपटांसाठी ओळखलं जातं. तिचा पहिला चित्रपट 1984 मध्ये आलेला 'जवानी' होता. रमेश बहल निर्मित आणि दिग्दर्शित या रोमँटिक चित्रपटात ती करण शाह, शर्मिला टागोर आणि अनुपम खेर यांच्याबरोबर दिसली होती.

हेही वाचा :

  1. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे नीलम कोठारी सोनी यांचा फॅमिलीसोबत पिकनिक-प्लॅन!
  2. अभिनेत्री नीलम कोठारीने मुंबईत साजरा केला 'करवा चौथ'