ETV Bharat / entertainment

माझ्यावर झालेले आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन: अभिनेते विजय पाटकरांचा संताप

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी आक्रमक होत, माझ्यावर होत असलेले आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन असा गर्भित इशारा दिला.

All India Film Corporation Election
अभिनेत्या वर्षा उसगावकर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 3, 2026 at 10:47 PM IST

|

Updated : June 3, 2026 at 11:01 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीचं माहेरघर असलेल्या कोल्हापुरात सध्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीनं वातावरण चांगलंच तापलं आहे. मेघराजराजे भोसले यांच्या नेतृत्वातील समर्थ पॅनेल विरोधात माजी अध्यक्ष विजय पाटकर, वर्षा उसगावकर, आनंद काळे यांचं चित्रकर्मी पॅनल एकमेकांसमोर उभं ठाकलं आहे. माजी अध्यक्ष विजय पाटकर यांच्यावर झालेल्या आरोपाला त्यांनी आज सडेतोड उत्तर दिलं. आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन असा जोरदार हल्लाबोल माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी केला आहे.

All India Film Corporation Election
अभिनेत्या वर्षा उसगावकर (ETV Bharat Reporter)

आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन : "मला जेव्हा विचारण्यात आलं माझ्या पॅनेलमधून उभा राहतोस का? म्हटलं मला लाज लज्जा शरम नीतिमत्ता आहे. तुमच्या पॅनलमधून उभारल्यास लोक माझ्या तोंडात शेण घालतील. मला चित्रकर्मी पॅनेलची माणसं हवी आहेत. साठ वर्षात पहिल्यांदा महामंडळावर प्रशासक नेमला जातोय, याची आम्हाला लाज वाटते. चेकबुक काढून घेतलं, दोन वर्ष एक रुपया खर्च करण्याचा हक्क नाही, याची तुम्हाला लाज नाही आणि आमच्यावर आरोप करताय का असा सवाल माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी केला. आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन असा जोरदार हल्लाबोल पाटकर यांनी केला. तर बिनविरोध निवडून आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी बिनविरोध निवडून आल्याबद्दल आभार मानले. "बिनविरोध निवडून आले याचा अर्थ असा नाही की मी निवडणुकीला घाबरते. मी राजकारण्याचीच मुलगी आहे, मला राजकारणातले चढउतार माहीत आहेत. महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप झाला, असं ऐकलं. राजकीय हस्तक्षेप झाला असेल, तर ते व्हायला नको," असं मत त्यांनी व्यक्त केलं

समर्थ पॅनलच्या धनाजी यमकरांनी दिलं प्रत्युत्तर : मेघराजराजे भोसले यांच्या नेतृत्वातील समर्थ पॅनलचे उमेदवार आणि महामंडळाचे माजी उपाध्यक्ष धनाजी मकर यांनी विजय पाटकर यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. "कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या ठिकाणी महामंडळाच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. याच इमारती भाड्यानं घेतल्या असत्या तर महामंडळाचे हजारो रुपये गेले असते. मात्र या भाड्यांमध्ये कमिशन मिळालं नाही, म्हणून हे लोक आरोप करत आहेत. पाटकर यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत, महामंडळाचे 10 लाख 78 हजार रुपये पहिल्यांदा भरावेत. महामंडळाचे माजी उपाध्यक्ष बिनशेंडीचे बाजीराव असलेल्या व्यक्तीनं पाटकरांना गोवलं. यामुळे संचालक मंडळ बदनाम झालं, चित्रकर्मी पॅनल म्हणजे टकलू हैवानाची गँग आहे. पॅनल चित्रकर्मी पैसे खाण्यात यांचीच वर्णी, अशी त्यांची अवस्था आहे," अशी घणाघाती टीका माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी यावेळी केली.

प्रचाराला आली गती, राज्यभर कलाकारांच्या भेटी : समर्थ पॅनलचे प्रमुख मेघराजराजे भोसले यांनी पुणे आणि मुंबईत तळ ठोकला आहे तर कोल्हापुरात माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी प्रचाराची सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. चित्रकर्मी पॅनेलने आज कोल्हापुरातील देवल क्लब येथे कलाकारांशी संवाद साधला यावेळी आनंद काळे, मिलिंद अष्टेकर यांच्यासह अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सभासद उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. 'अनेक सरकारे येऊन गेली, शेतकऱ्यांच्या अडचणींवर शेतकऱ्यांनीच तोडगा काढला पाहिजे'- अभिनेता प्रविण तरडे
  2. रितेश देशमुख सपत्नीक अंबाबाई दर्शनाला, मायबाप प्रेक्षकांचं मानलं आभार...
  3. TVK प्रमुख जोसेफ विजय बनले तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री, 9 मंत्र्यांनीही घेतली शपथ
Last Updated : June 3, 2026 at 11:01 PM IST