विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना करणार 'या' ठिकाणी लग्न...
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना आता लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. आता हे जोडपे कुठे लग्न करणार याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 23, 2026 at 11:14 AM IST
हैदराबाद : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हे दोन्ही स्टार्स त्यांच्या लग्नाच्या अफवांमुळं बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख सोशल मीडियावर अनेक वेळा समोर आली आहे. आता या जोडप्यानं सोशल मीडिया पोस्टद्वारे बातमीला दुजोरा दिला आहे. इतकेच नाही तर रश्मिका आणि विजय दोघांनीही पोस्टमध्ये त्यांच्या लग्नाचे नाव 'द वेडिंग ऑफ विरोश' असंही ठेवलं आहे. आता हे नाव कोणताही लग्न नियोजक किंवा कौटुंबानं दिलं नाही. त्यांच्या चाहत्यांनी हे नाव प्रेमानं दिलं आहे.
विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांची पोस्ट : दरम्यान सोशल मीडिया हँडल इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं, 'आमच्या प्रिय चाहत्यांनो, जेव्हा आम्ही कोणतेही नियोजन केले नव्हते, जेव्हा आम्ही स्वतःसाठी काहीही ठरवले नव्हते - तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर होता." पुढं, त्यांनी लिहिलं, 'खूप प्रेमानं, तुम्ही आम्हाला एक नाव दिले. तुम्ही आम्हाला 'विरोश' म्हटले. आज, आमच्या संपूर्ण मनानं, आम्ही आमच्या आयुष्याची ही सुरुवात तुम्हाला समर्पित करतो. आम्ही याला 'विरोशचे लग्न' म्हणू इच्छितो. आम्हाला इतक्या प्रेमानं जपल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही नेहमीच आमचा भाग राहाल. भरपूर प्रेम आणि मीठी.' उल्लेखनीय म्हणजे, पोस्टमध्ये तारीख आणि ठिकाण यासारख्या लग्नाच्या तपशीलांचा समावेश नव्हता. दरम्यान काही दिवसापूर्वी एक पत्रिका सोशल मीडियावर समोर आली होती. यामध्ये लग्नाची तारीख 26 फेब्रुवारी आणि 4 मार्च रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शनची घोषणा करण्यात आली होती. याशिवाय हे जोडपे आता सात फेरे राजस्थानमधील उदयपुरमध्ये घेणार असल्याचं समजत आहे.


विजय आणि रश्मिकाची प्रेमकहाणी कशी सुरू झाली? : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी 2018मध्ये आलेल्या 'गीता गोविंदम' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या दोघांचा हा चित्रपट खूप हिट झाला होता. यानंतर त्यांच्या डेटिंगबद्दलच्या अफवा पसरू लागल्या. दरम्यान, 'गीता गोविंदम' प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यानंतर, रश्मिकानं तिचा सह-कलाकार रक्षित शेट्टीबरोबर झालेल्या साखरपुडा तोडला. यानंतर तिचा साखरपुडा तुटल्यानंतर सोशल मीडियावर याबद्दल खूप चर्चा झाल्या होत्या. यानंतर तिनं शांतपणे चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं. खूप लवकरच रश्मिकाच्या कारकिर्दीत मोठा बदल पाहायला मिळाला. तिनं कन्नड चित्रपट उद्योग व्यतिरिक्त तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करणं सुरू केलं. यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर 2019मध्ये पुन्हा रश्मिका आणि विजय 'डियर कॉम्रेड' या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं. या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री ही प्रेक्षकांना खूप आवडली होती. याशिवाय तिनं हिंदी चित्रपटांमध्ये देखील दमदार काम केलंय. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, रश्मिका आणि विजय यांनी हैदराबाद येथील अभिनेत्याच्या घरी लग्न केल्याची बातमी देखील समोर आली होती. तसेच रश्मिकानं 'द गर्लफ्रेंड' चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान विजयच्या हाताचे प्रेमाने किस घेतला होता. यानंतर सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली होती. आता लोक त्यांच्या लग्नाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
हेही वाचा :
- विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नाच्या कथित लग्नाच्या बातमीनंतर त्यांच्या व्यवस्थापन टीमनं केलं निवेदन जारी...
- रश्मिका मंदान्ना स्टारर 'मैसा'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील पहिली झलक केली शेअर, पाहा व्हिडिओ...
- 'मायसा'मध्ये रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिका साकारणार, 'श्रीवल्ली' पहिल्यांदा करणार अॅक्शन...

