रणवीर सिंगला धमकी दिल्याबद्दल लॉरेन्स टोळीतील कथित सदस्य हॅरी बॉक्सरविरुद्ध लूकआउट नोटीस जारी...
रणवीर सिंगला लॉरेन्स बिश्नोई टोळीनं धमकी देऊन 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीमधील हॅरी बॉक्सरविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केलं आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 21, 2026 at 9:46 AM IST
|Updated : February 21, 2026 at 10:00 AM IST
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रणवीर सिंगविरुद्ध 20 कोटी रुपयांच्या धमक्या आणि खंडणीच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या मते लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कथित सदस्य हॅरी बॉक्सरनं धमकीचा संदेश पाठवला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. आता याप्रकरणी तपास अधिक केला जात आहे. रोहित शेट्टीच्या घरी गोळीबार झाल्यानंतर रणवीर सिंगला धमकीचा संदेश आल्यावर आणखीचं चिंता व्यक्त केली जात आहे. रणवीर सिंगचे मॅनेजर विजय सुब्रमण्यम यांना सुरुवातीला तीन धमकीचे कॉल आले, यानंतर फोनला उत्तर न मिळाल्यानं हॅरी बॉक्सरनं व्हॉट्सअॅपवर धमकीचा ऑडिओ मेसेज पाठवला. दरम्यान तपासात असे दिसून आले की, ऑडिओ मेसेजमधील आवाज लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार हॅरी बॉक्सरचा आहे.
रणवीर धमकी प्रकरणात हॅरी बॉक्सरविरुद्ध लूकआउट नोटीस : रणवीर सिंगला धमकी देणाऱ्या लॉरेन्स टोळीतील हॅरी बॉक्सरविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आलंय. अलीकडेच, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सरनं अभिनेता रणवीर सिंगला धमकी देणारा व्हॉइस मेसेज पाठवला होता. ही व्हॉइस नोट अमेरिकेतील एका नंबरवरून रणवीरच्या मॅनेजरला पाठवली गेली होती. या घटनेनंतर रणवीर सिंगची सुरक्षा वाढवण्यात आली. आता, मुंबई गुन्हे शाखेनं या प्रकरणात मोठी कारवाई केली असून रणवीर सिंगला धमकी देणाऱ्या हरिचंद्र उर्फ हॅरी बॉक्सरविरुद्ध लूकआउट सर्क्युलर (LOC) जारी केल्यानंतर याबद्दल अधिक चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मुंबई पोलिसांनी धमकीची व्हॉइस नोट पडताळणीसाठी पंजाब आणि हरियाणा येथे पाठवली आहे.
Mumbai | The Mumbai Crime Branch has issued a Look Out Circular (LOC) against Lawrence Bishnoi gang member Harichandra alias Harry Boxer for threatening Bollywood actor Ranveer Singh. Police had sent the threatening voice note received by Ranveer Singh's manager to Punjab and…
— ANI (@ANI) February 21, 2026
'या' स्टार्सला मिळाली धमकी : व्हॉइस नोट पाठवणाऱ्यानं स्वतःची ओळख हॅरी बॉक्सर म्हणून करून 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच टीमनं रणवीरला ज्या अमेरिकन नंबरवरून व्हॉइस नोट पाठवली गेली, त्याची चौकशी करण्यासाठी अमेरिकन एजन्सींशी देखील संपर्क साधला आहे. आता याप्रकरणी अधिकच कसून चौकशी केली जात आहे. याआधी देखील अनेक स्टार्सला लॉरेन्स बिश्नोई टोळीनं धमकी दिली आहे. यामध्ये सलमान खान, रोहित शेट्टी, एपी ढिल्लों आणि गिप्पी ग्रेवाल या स्टार्सचा समावेश आहे.
हेही वाचा :

