'कांतारा'मधील दैवाची नक्कल प्रकरणारवर रणवीर सिंगबाबत कर्नाटक उच्च न्यायालयानं काय निर्णय दिला? वाचा सविस्तर
रणवीर सिंगला कर्नाटक उच्च न्यायालयातून आता काही दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे. 'कांतारा'मधील दैवाची नक्कल प्रकरणारवर आता 2 मार्च 2026 रोजी सुनावणी होणार आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 24, 2026 at 4:29 PM IST
मुंबई : 'धुरंधर' चित्रपटातून शिखरावर पोहोचलेला रणवीर सिंगनला कर्नाटक उच्च न्यायालयानं मोठी सूट दिली आहे. 'कांतारा' चित्रपटातील दैवाच्या दृश्याचे नक्कल केल्यानंतर त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली गेली होती. आता न्यायालयानं त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायालयानं म्हटलं आहे की, तपासादरम्यान रणवीरवर कोणतीही सक्तीची कारवाई केली जाऊ नये. याशिवाय न्यायालयानं त्याला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 मार्च 2026 रोजी होईल. बंगळुरूच्या एका वकिलानं रणवीर सिंगविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हा खटला सुरू झाला. यामध्ये आरोप केला गेला होता की, 'कांतारा'मधील दैवाची नक्कल करून कर्नाटकातील लोकांच्या श्रद्धेत खोलवर रुजलेली चामुंडी दैवा परंपरेची खिल्ली उडवली गेली.
'कांतारा' चित्रपटातील देवीच्या दृश्याची नक्कल : दरम्यान हा खटला जानेवारी 2026 रोजी दाखल करण्यात आला होता. तसेच गेल्या नोव्हेंबरमध्ये इफ्फीच्या समारोप समारंभानंतर वाद सुरू झाला होता. रणवीरच्या नक्कल करत असतानाच्या व्हिडिओवर त्याला प्रचंड ट्रोलही करण्यात आले होते. रणवीर गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात 'धुरंधर' चित्रपटाचे प्रमोशन करत होता. यात त्यानं 'कांतारा' चित्रपटातील देवीच्या दृश्याची नक्कल केली. याशिवाय व्हिडिओमध्ये तो असं म्हणतो की,'मी थिएटरमध्ये 'कांतारा' पाहिला. ऋषभचा अभिनय अद्भुत होता. विशेषतः ज्या दृश्यात 'फीमेल घोस्ट' तुमच्यात प्रवेश करते ते दृश्य अद्भुत होते.' लोकांनी त्याच्या विधानावर आक्षेप घेतला. यानंतर अभिनेत्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण पाहून भडकले होते. त्यांनी या व्हिडिओची जोरदार टीका केली होती.
ऋषभ शेट्टीनं त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला : 'कांतारा' स्टार ऋषभ शेट्टीनं त्याला स्टेजवर हे करण्यापासून रोखले. जेव्हा रणवीर पाहुण्यांना भेटण्यासाठी स्टेजवरून खाली आला होता. यावेळी तो ऋषभला पाहून खूप उत्साहित झाला होता. त्यानं दैवाची नक्कल करायला सुरुवात केली, यानंतर ऋषभनं त्याला शांतपणे थांबण्याचा इशारा केला. असं देखील काही बातम्यामध्ये समोर आलं होतं. हे प्रकरण जास्त वाढल्यानंतर रणवीर सिंगनं माफी मागितली. त्यानं यात म्हटलं की, त्याचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तो फक्त ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे कौतुक करू इच्छित होता. अनेक लोकांना 'फीमेल घोस्ट' दैवाला आणि बूट घालून स्टेजवर सादरीकरण केल्यामुळं राग आला. तसेत यापूर्वी ऋषभ शेट्टीनं कोणाचेही नाव घेता म्हटलं होतं की, "चित्रपटाचा बराचसा भाग अभिनय आणि सिनेमाचा आहे, परंतु दैवाचा घटक अत्यंत संवेदनशील आणि पवित्र आहे. मी जिथे जातो तिथे लोकांना विनंती करतो की, स्टेजवर हे पुन्हा करू नये." सध्या तरी न्यायालयानं रणवीर सिंगला दिलासा दिला असून यावर अधिक चौकशी केली जात आहे.
हेही वाचा :

