पंजाबी गायक दिलजीत दोसांझ 'कौन बनेगा करोडपती'मध्ये गेल्यानंतर वादात फसला, जाणून घ्या कारण...
पंजाबी गायक दिलजीत दोसांझ अलीकडेच 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये गेला होता. आता या शोमध्ये गेल्यानंतर तो वादात सापडला आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : November 1, 2025 at 4:18 PM IST
मुंबई : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ अलीकडेच 'कौन बनेगा करोडपती' या गेम शोमध्ये दिसला होता. या शोचा नवीन भागाबद्दल वाद निर्माण झाला आहे. शोच्या प्रोमोमध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे पाय स्पर्श करताना दाखवल्यानंतर लगेचच, खलिस्तानी समर्थक गट सिख्स फॉर जस्टिस (SFJ)नं गायकाला धमकी दिली आहे. १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोसांझच्या ऑस्ट्रेलियातील संगीत कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता, या वादाच्या पार्श्वभूमीवर, दिलजीतनं स्पष्ट केलं आहे की, तो कोणत्याही चित्रपटाचे किंवा गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी शोमध्ये गेला नव्हता, तर पंजाब पूर मदत प्रयत्नांना जागरूकता आणि पाठिंबा देण्यासाठी गेला होता.
दिलजीत दोसांझला मिळाली धमकी : पंजाबी गायकानं शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, "मी कोणत्याही चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेलो नव्हतो. मी पंजाब पूरग्रस्त भागात गेलो होतो, जेणेकरून राष्ट्रीय स्तरावर पुराची चर्चा व्हावी आणि लोक देणगी देऊ शकतील." सिख्स फॉर जस्टिस (SFJ)नं दिलजीत दोसांझवर अमिताभ बच्चन यांचे पाय स्पर्श केल्याबद्दल टीका केली. याशिवाय त्यांनी आरोप केला की, अभिनेता अमिताभ बच्चन यांनी १९८४ मध्ये त्यांच्या 'खुन का बदला खुन' या घोषणेद्वारे हिंसाचार भडकावला होता. सिख्स फॉर जस्टिसनं म्हटलं आहे की, दोसांझच्या कृत्यानं नरसंहारातील पीडितांचा, विधवा आणि अनाथांचा अपमान केला आहे.
दिलजीत दोसांझचं वर्कफ्रंट : कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, दिलजीत दोसांझनं अलीकडेच अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'मध्ये भाग घेतल्यानंतर तो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे, या शोमध्ये त्यानं त्याचे 'मैं हूं पंजाब' हे गाणं गायलं होतं. १४व्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यानंतर, त्यानं 'कौन बनेगा करोडपती' १७ मध्ये ५० लाख रुपये जिंकले. तसेच गायक 'बॉर्डर २'मध्ये दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटामध्ये सनी देओल हा मुख्य भूमिकेत असणार आहे. त्याचा हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. याशिवाय तो अनेक पंजाबी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :

