भाजपचे प्रदेशाध्यक्ष सिमक भट्टाचार्य यांनी अनुपम खेरबद्दल केलं विधान, व्हिडिओ व्हायरल...
भाजपनं बंगालमध्ये पहिल्यांदाच विजय मिळावला आहे. आता यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सिमक भट्टाचार्य यांनी अनुपम खेरबद्दल एक विधान केलंय.

By ETV Bharat Entertainment Team
Published : May 6, 2026 at 2:22 PM IST
हैदराबाद : पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचंड विजयानंतर अनेक नेते राजकीय विधान करत आहेत. अलीकडेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सिमक भट्टाचार्य यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्ष तृणमूल काँग्रेसवर (TMC) टीका केली. याशिवाय त्यांनी बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांचा बोलत असताना संदर्भही दिला आहे. आता याबद्दल एक नवीन चर्चा निर्माण झाली आहे. या नेत्यानं व्हिडिओत म्हटलं, "अनुपम खेर यांच्या डोक्यावर नवीन केस उगवू शकतील, पण TMC पुन्हा कधीही सरकार स्थापन करू शकणार नाही." आता, बंगाल भाजप अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर बंगाल भाजप अध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांचा एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यांना गंमतीमध्ये म्हटलं "अरे भावा! मी तुझं काय वाकडं केलंय! माझ्या डोक्यावर केस फुटावेत असं तुला का वाटतंय! सध्याच्या परिस्थितीत, शंभर जन्म घेतले तरीही मी तसं कधीच इच्छिणार नाही! जय श्रीराम!" याशिवाय त्यांनी आपल्या पोस्टवर हसणाऱ्या इमोजी देखील पोस्ट केले आहेत.
अनुपम खेर यांच्या पोस्टवर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया : अनुपम खेर यांनी पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सनं मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं, "अनुपम खेर असे म्हणत असतील, तुम्ही मला का तोडले?" दुसऱ्या एकानं लिहिलं, "अनुपम सर, तुमचे केस फक्त एकदाच पुन्हा वाढू द्या... ते कसे दिसतात, हे आम्हीही पाहू..." दुसऱ्या एकानं लिहिलं, "काही हरकत नाही, साहेब. एकदा का तुमचे केस परत आले, की आम्हाला तुमचे आणखी एक-दोन चित्रपट पाहायला मिळतील." याशिवाय अनेकजण या पोस्टवर इमोजी शेअर करत आहेत.
अरे भैया जी! मैंने आपका क्या बिगाड़ा है! क्यों आप चाहते हो कि मेरे सिर पर बाल आ जायें! मौजूदा हालात में जन्मों तक नहीं चाहूँगा! जय श्री राम! 🤪🤪🤣🤣🤣😂😂😂😂😂 pic.twitter.com/SoTQEYUGxy
— Anupam Kher (@AnupamPKher) May 5, 2026
अनुपम खेर यांचे आगामी चित्रपट : कामाच्या आघाडीवर, अनुपम खेर शेवटचे 'तन्वी द ग्रेट' या चित्रपटात दिसले होते, यामधील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रुपेरी पडद्यावर यशस्वी झाला नाही. आता, अनुपम खेर 'फ्लिकर' या चित्रपटात दिसणार आहेत, जो त्यांचा 551वा चित्रपट असणार आहे. 'फ्लिकर'मधील त्यांचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला होता. यानंतर अनुपम खेर यांच्याकडे 'खोसला का घोसला 2' हा चित्रपट देखील आहे, यात ते बोमन इराणीबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत भागिया यांनी हे करत आहेत.

