अमिताभ बच्चननं 'कल्की 2'चं शूटिंग केलं सुरू, फोटो व्हायरल
अमिताभ बच्चन यांनी आता 'कल्की 2'चं शूटिंग सुरू केलंय. त्यांनी आता काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यात कमल हासन देखील असल्याचा दिसत आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 24, 2026 at 3:27 PM IST
हैदराबाद : हिंदी चित्रपटसृष्टीतील शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी नागा अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता या चित्रपटाच्या सीक्वेलवर काम सुरू आहे. अमिताभ बच्चन आणि कमल हासन 'कल्की 2'च्या सेटवर पुन्हा एकत्र आले आहेत. या चित्रपटाच्या सीक्वेलची अधिकृत सुरुवात हैदराबादमध्ये झाली आहे. अमिताभ बच्चन आणि कमल हासन 'कल्की 2'च्या सेटवर पुन्हा एकत्र दिसले आहेत. या दोन्ही दिग्गजांना एकत्र पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अलीकडेच, बिग बी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी माहिती दिली आहे की ते या रविवारी हैदराबादमध्ये शूटिंग करत असल्याने त्यांच्या चाहत्यांना भेटू शकणार नाहीत. त्यांनी 'कल्की 2'च्या सेटवरील अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते 'अश्वत्थामा'ची भूमिका साकारताना दिसत आहेत.
'कल्की 2'च्या सेटवरील बिग बींचे फोटो : अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच त्यांच्या ब्लॉगवर हैदराबादमधील 'कल्की 2'च्या सेटवरील काही पडद्यामागील फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, अमिताभ कमल हासनला मीठी मारताना दिसत आहेत, ज्यांच्यामध्ये त्याचे सीक्वेलमध्ये सीन्स आहेत. कमल हासन आणि अमिताभ दोघेही 'कल्की 2898 एडी' या पहिल्या चित्रपटाचा भाग असले तरी, त्यांचे एकत्र फारसे सीन नव्हते. हे फोटो शेअर करताना बिग बींनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिलं, 'मी त्यांना सांगितलं होतं की, मी या रविवारी येऊ शकणार नाही कारण, मी हैदराबादमध्ये शूटिंग करत होतो. पण तरीही ते आले. खात्री करण्यासाठी. हा गोंडस माणूसही. पण माफ करा. आधी काम करा, नंतर आराम करा.'




कमल हासनचं केलं कौतुक : कमल हासनबद्दल बोलताना त्यांनी पुढं लिहिलं, 'महान कमल हासन यांना भेटत आहे. आपण बऱ्याच काळानंतर एकत्र काम करणार आहोत. 'गरीब'मध्ये शेवटचेच. 'कल्की 2'नं काम सुरू केले आहे, आणि रविवारी तिथे असण्याचे प्रेम आणि आपुलकी मी नेहमीच जपून ठेवेल. पण आशा आहे की, येत्या रविवारीही मी सर्वांबरोबर असेन.' हा चित्रपट 2024च्या ब्लॉकबस्टर 'कल्की 2898 एडी'चा सीक्वेल आहे, जो हिंदू धर्मग्रंथांनी प्रेरित एक डिस्टोपियन विज्ञान-कल्पनारम्य महाकाव्य आहे. सीक्वेलमध्ये, बिग बी अश्वत्थामाची भूमिका पुन्हा साकारत आहेत. कमल हासन सुप्रीम यास्किनची भूमिकेतचं दिसणार असल्याची अपेक्षा आहे. पौराणिक कथा आणि भविष्यकालीन घटकांचे मिश्रण करणारी आणि पडद्यावर दोन महान कलाकारांना एकत्र आणणारी ही कथा पाहणे प्रेक्षकांसाठी आनंददायी असणार आहे.
हेही वाचा :

