'दशावतारा' ते 'होमबाउंड'शिवाय 'या' चित्रपटांची ऑस्करमध्ये एंट्री झाल्यानंतर भारतीयांच्या वाढल्या अपेक्षा...
मराठी चित्रपट 'दशावतारा' ते 'होमबाउंड' या चित्रपटांची ऑस्करमध्ये एंट्री झाल्यानंतर अनेक भारतीय आनंदी झाले आहेत. आता कुठला चित्रपट बाजी मारेल हे काही दिवसात समजेल.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 10, 2026 at 11:16 AM IST
मुंबई : भारतीय चित्रपटांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. ऑस्करची 98वा आवृत्ती होणार आहे. 2026च्या ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांनी जोरदार उपस्थिती लावली आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसनं या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र असलेल्या 201 चित्रपटांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये पाच भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. ही बातमी कळताच भारतीय चित्रपटप्रेमींचे चेहरे आनंदाने फुलले. या यादीत समाविष्ट असलेले भारतीय चित्रपट म्हणजे 'दशावतारा', 'कांतारा: चॅप्टर 1', 'तन्वी द ग्रेट', 'होमबाउंड' आणि 'सिस्टर मिडनाईट'. हे सर्व चित्रपट आता सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, अभिनय, छायांकन आणि पटकथा अशा मुख्य ऑस्कर श्रेणींसाठी शर्यतीत आहेत. यावरून हे सिद्ध होते की, भारतीय कथा आता संपूर्ण जगापर्यंत पोहोचत आहेत. या चित्रपटांकडून भारतीयांना खूप अपेक्षा आहेत.
दशावतार : ऑस्करच्या पात्रता यादीत समाविष्ट झाल्यानंतर 'दशावतार' हा मराठी चित्रपटानं आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाच्या कहाणीत कोकणातील पारंपारिक लोककला आणि खाणकाम सारख्या गंभीर मुद्दे आहेत. खोलवर रुजलेली ही कहाणी प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. या चित्रपटानं ऑस्कर प्रवेशानं सर्वांना आश्चर्यचकित केलंय. हा चित्रपट मराठी चित्रपटीसृष्टीतील पहिला आहे, जो ऑस्करसाठी जात आहे.
कांतारा: चॅप्टर : होम्बाले फिल्सनं स्वतः सोशल मीडियावर पुष्टी केली की, 'कांतारा: चॅप्टर 1' ऑस्करसाठी ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि दमदार अभिनय असलेला हा चित्रपट, 2025 मधील हिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटामध्ये रुक्मिणी वसंत आणि गुलशन देवैया यांच्या विशेष महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटानं जगभरात 850 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'कांतारा: चॅप्टर 1' चित्रपटाची कहाणी, भावना, अभिनय आणि तांत्रिक गुणवत्ता यांचे समीक्षकांनी खूप कौतुक केले आहे. आता हा चित्रपट ऑस्करसाठी एक मजबूत दावेदार असल्याचं म्हटलं जात आहे.
तन्वी द ग्रेट : अनुपम खेर दिग्दर्शित 'तन्वी द ग्रेट' त्याच्या साधेपणा आणि भावनिक कहाणीसाठी खूप विशेष आहे. या चित्रपटामध्ये एक हृदयस्पर्शी कहाणी दाखविण्यात आली आहे. कोणत्याही धाडसाशिवाय हा चित्रपट पडद्यावर मानवी भावना सुंदरपणे मांडतो. या चित्रपटाची देखील ऑस्करमध्ये एंट्री झाली आहे.
होमबाउंड : 'होमबाउंड' चित्रपट यावर्षी भारताचा अधिकृत ऑस्करसाठी प्रवेश मानला जात आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेठवा यांच्या विशेष भूमिका आहेत.
सिस्टर मिडनाइट : 'सिस्टर मिडनाईट'ची निर्मिती जरी यूकेच्या एका प्रोडक्शन हाऊसनं केली आहे, मात्र याची कहाणी पूर्णपणे भारतीय आहे. ब्रिटिश-भारतीय दिग्दर्शक करण कंधारी यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटात राधिका आपटे,अशोक पाठक आणि छाया कदम सारखे दिग्गज कलाकार आहेत. ऑस्करसाठी प्रवेश होणे हे विजयाच्या दिशेनं पहिले पाऊल मानले जात आहे. आता, यापैकी कोणता चित्रपट अंतिम नामांकनांमध्ये पोहोचतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आता या यादीत पाच भारतीय चित्रपटांची उपस्थिती दर्शवते की, भारतीय कंटेंटनं आता जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
98व्या ऑस्करचं नियोजन
- नामांकने जाहीर : गुरुवार 22 जानेवारी, 2026.
- नामांकनांसाठी मतदानाला सुरुवात : सोमवार 12 जानेवारी, 2026.
- नामांकनांसाठी मतदान समाप्त : शुक्रवार, 16 जानेवारी, 2026.
- पुरस्कार सोहळा : रविवार, 15 मार्च, 2026.
हेही वाचा :

